06/09/25

प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

बीड दि.११(प्रतिनिधी)-परळी येथील मूळ रहिवासी असलेले
प्रा. काचगुंडे श्रीहरी हरिश्चंद्र हे इतिहास विषयात सेट उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मार्फत दि.०७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या ३९ व्या सेट परीक्षेत
परळी वैजनाथ येथील रहिवासी असलेले व सध्या स्वामी विवेकानंद ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिक्षणशास्त्र (बी.एड) महाविद्यालय लोहा, जि. नांदेड येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. काचगुंडे श्रीहरी हरिश्चंद्र हे इतिहास विषयात सेट उत्तीर्ण झाले आहेत. या अगोदर ते शिक्षणशास्त्र (एम.एड) विषयात नेट व इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष व सचिव, प्राचार्य, व पीएच.डी मार्गदर्शक डॉ. केशव इंगोले, डॉ. अशोक गिणगिणे, डॉ. शशिकांत अन्नदाते, मित्र श्री. शिवराज ढाकणे, शिवाजी चाटे, शिवाजी काचगुंडे, निवृत्ती गडदे, रमेश गडदे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …