विना अनुदानितचे संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे यांच्या प्रकृतीसाठी आणि शंभर टक्के अनुदानासाठी श्री एकलिंगजी शिव मंदिरात वैजनाथ चाटे व लहाने यांचे शंभू महादेवला साकडे
परळी दि.३०(प्रतिनिधी)
विनाअनुदानित शाळांना 100% अनुदान मिळावे या मागणीसाठी मागील पाच दिवसापासून विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दैवत महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर हे आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची बीपी आणि शुगर लेवल कमी झाल्याने प्रकृती खालावली. तरीही खंडेराव जगदाळे यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यांची प्रकृती सुधारावी तसेच राज्य सरकारला 100% अनुदान देण्यासंदर्भात सुबुद्धी द्यावी या मागणीसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे आणि लहाने सर यांनी परभणी शहराजवळील परभणी गंगाखेड या रस्त्यावर असलेल्या श्री एकलिंगजी शिव मंदिरात शंभू महादेवला साकडे घातले.
याबाबत अधिक माहिती अशी की राज्यातील विनाअनुदानित शाळांना पुढील टप्पा वाढ द्यावी तसेच प्रचलित नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्या. या मागणीसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध आंदोलन सुरू आहेत. सरकारने टप्पा वाढीसंदर्भात विधिमंडळात केलेली घोषणेचा लवकरात लवकर शासन निर्णय काढावा. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत. संपूर्ण राज्यात विविध प्रकारचे आंदोलन करून देखील सरकार कसली ही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने कोल्हापूरमध्ये खंडेराव जगदाळे सर आणि त्यांच्या सहकार्याने आमरण उपोषण सुरू केले आहे. काल उपोषणाचा पाचवा दिवस होता. या पाचव्या दिवशी उपोषण कर्ते खंडेराव जगदाळे सर यांची शुगर लेवल आणि बीपी कमी झाल्याने प्रकृती खालावली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाने त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. मात्र खंडेराव जगदाळे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. यावेळी अनेक विना अनुदानित शाळेतील शिक्षकांनी जगदाळे सरांना उपचार घेण्यासंदर्भा मध्ये विनंती केली. तसेच दुसरीकडे राज्यातील अनेक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपले देव पाण्यात घातले. महाराष्ट्राचे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ चाटे सर आणि लहाने सर यांनी काल परभणी शहराजवळ असलेल्या परभणी गंगाखेड रस्त्यावरील श्री प्रभु एकलिंगजी शिव मंदीरात प्रभू शंभू महादेवाला लवकरात लवकर शासनाने GR काढावा व खंडेराव जगदाळे सर यांची तब्बेत उत्तम आरोग्य राहावे यासाठी साकडे घातले.
_______________________
