श्री खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची अलोट गर्दी
अवघ्या वीस मिनिटात भाविकांचे होणार दर्शन
-राणा चौव्हाण
वीज पुरवठा खंडित झाल्यास
जनरेटरची सुविधा
सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या
संख्येत वाढ
बीड दि.०५ (प्रतिनिधी )- बीड शहरासह जिल्ह्याचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवाला गुरुवार दिनांक 03 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. श्री
खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवा निमित्त यात्रा मोठ्या प्रमाणात भरली आहे. आज यात्रेचा तिसरा दिवस आहे. दरम्यान आज शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने श्री खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी व यात्रेचा आनंद घेण्यासाठी बीड शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री खंडेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात विविध खेळण्यांची दुकाने सजलेली आहेत. शिवाय या मोठ मोठे रहाटपाळणे आले आहेत. याचा आनंद बीड शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत.
बीड शहराचेच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याचे श्रध्दास्थान व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री खंडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री खंडेश्वरी देवी यात्रा महोत्सवाची सुरुवात गुरुवार दिनांक 03 ऑक्टोबर पासून झाली आहे. 12 ऑक्टोबर शनिवार रोजी रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. रावण दहन आणि सीमा उल्लोघनांच्या
कार्यक्रमानंतर श्री खंडेश्वरी देवी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. या नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने श्री खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात रंगरंगोटी आणि मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली असल्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे. या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी खंडेश्वरी मातेच्या मंदिरात हजेरी लावत आहेत. या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री खंडेश्वरी देवी मंदिर परिसर खाऊच्या, लहान मुलांच्या खेळणीच्या दुकानासह, रहाट पाळण्यांनी परिसर गजबजुन गेला आहे. देवीचे भाविक भक्त नऊ दिवस उपवास करुन देवीची आराधना करतात. काही भाविक या नऊ दिवसांत अनवाणी राहून देवीची आराधना करतात. विजयादशमी म्हणजेच दसरा सणाच्या दिवशी देवीचे सर्व भाविक भक्त श्री खंडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन यात्रेत सहभागी होतात. या नऊ दिवसांत यात्रेच्या निमित्ताने श्री खंडेश्वर देवी मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असते. यात्रेच्या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल होते.
भाविक भक्तांच्या सोईसाठी व सुविधांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. श्री खंडेश्वरी देवीच्या व भाविकांच्या सेवेसाठी शेकडो स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने काम करत आहेत.
श्री खंडेश्वर देवीच्या परिसरात भाविक भक्तांचे होत असलेली गर्दी पाहून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अवघ्या वीस मिनिटात भाविकांचे होणार दर्शन
-राणा चौव्हाण साहेब
दरवर्षी श्री खंडेश्वर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी वाढ होत आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता भाविकांना दर्शन घेण्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागते. या वर्षी भाविकांना जास्त वेळ रांगेत उभे न राहता अवघ्या २० मिनीटात त्यांचे दर्शन होईल असे नियोजन करण्यात
आले असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष चौहाण यांनी दिली आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्यास
जनरेटरची सुविधा
वीज वितरण कंपनीकडून परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला तरी ट्रस्टच्या वतीने मंदिर आणि परिसरामध्ये जनरेटरचा वापर करुन विद्युतीकरण करण्यात आले आहे.
सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची
संख्येत केली वाढ
श्री खंडेश्वर देवी यात्रा महोत्सवाच्या काळात परिसरातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढविण्यात आली आहे. शिवाय यातील काही अत्यावश्यक कॅमेरे कायमस्वरुपी ठेवण्यात येणार आहेत.
________________________