06/09/25
9mm pistol bullets and handgun on black table.

परळीत तीन पिस्टल, जिवंत काडतुसासह तरूण पकडला

परळीत तीन पिस्टल, जिवंत काडतुसासह तरूण पकडला

परळी दि.५(प्रतिनिधी)- परळी शहरात ३ गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरूणास परळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
परळी शहरातील जुन्या परळी मधील गणेशपार भागात असलेल्या काळरात्री मंदिर पाठीमागे एक ३० वर्षीय युवक तीन गावठी पिस्टल आणि ६ जिवंत काडतुसे बाळगून असल्याच्या गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहिती वरून परळी शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. या वेळी त्याच्याकडे ३ गावठी पिस्टल आणि ६ जिवंत काडतुसे आढळून आली. ज्याची अंदाजे किंमत १ लाख ५६ हजार एवढी आहे. वैभव रोहीदास घोडके (वय ३० वर्ष रा. भिमनगर ) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे विष्णू सानप यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुरनं. १६४/२०२४ कलम ३,२५ शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …