06/09/25
Oplus_131072

ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनीच आमचा पक्ष फोडला; धनंजय मुंडे यांना पराभूत करा! परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी दादागिरी वाढली – शरद पवार

ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनीच आमचा पक्ष फोडला; धनंजय मुंडे यांना पराभूत करा!

परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी दादागिरी वाढली – शरद पवार

परळी दि.९(प्रतिनिधी)-
ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनीच आमचा पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला अशा लोकांना सत्तेतून हद्दपार करा. परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी आणि दादागिरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही दादागिरी संपविण्यासाठी महा विकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा असे आवाहन खा. शरद पवार यांनी परळीतील जाहीर सभेत बोलताना केले. या सभेला बीडचे खा. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे आज बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले आहेत. बीड जिल्ह्यातील परळी मध्ये त्यांची पहिली सभा झाली. दुसरी सभा आष्टी येथे होणार आहे. त्यांनतर तिसरी सभा बीडमध्ये होणार आहे. परळी येथील जाहीर सभेत बोलताना खा. शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा खरपुस समाचार घेतला. या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये गुंडगिरी आणि दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इथले व्यापारी दहशतीखाली गाव सोडून गेले आहेत. ही गुंडगिरी संपवण्याचे काम परळीकरांच्या हातात आहे. गुंडगिरी आणि दादागिरी करणाऱ्या गुंडाना पोसणाऱ्या लोकांना पराभूत करा असे आवाहन करत खा. शरद पवार यांनी कृषिमंत्री तथा अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. या वेळी बोलताना पवार म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पंडित अण्णा मुंडे त्यांच्या मुलाला म्हणजे धनंजयला माझ्याकडे घेऊन
आले, आम्हाला तुमची मदत हवी आहे असं म्हणाले, त्यांना संकट काळात मी मदत करण्याचा शब्द दिला. त्यांना विधानपरिषद मध्ये संधी दिली, विरोधीपक्ष नेतेपद दिले. त्यानंतर मंत्रिमंडळात संधी दिली. मात्र धनंजय मुंडे यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली. काही वर्षापूर्वी त्यांनीच आमचा पक्ष फोडला, आम्ही संधी दिली आणि त्यांनी आम्हाला धोका दिला. आमच्या सोबत गद्दारी केली या गद्दारांना सत्तेतून हद्दपार करा आणि महा विकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा असे आवाहन शरद पवार यांनी केले.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …