06/09/25

अनिल दादा जगताप यांना ख्रिश्चन धर्मगुरुंचे मिळाले आशीर्वाद

अनिल दादा जगताप यांना ख्रिश्चन धर्मगुरुंचे मिळाले आशीर्वाद

बीड दि.१७( प्रतिनिधी)- गेल्या चाळीस वर्षांपासून सकल जाती धर्मांतील जनसमुदायास सोबती घेऊन चालणारे बीड विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सर्व जाती धर्माचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत आहे. दि. 17 रोजी सकाळच्या सुमारास बीड शहरातील ख्रिश्चन धर्मियांच्या असेम्बली ऑफ गॉड चर्च या पवित्र स्थळी अनिलदादा जगताप यांनी भेट देऊन मुक्त संवाद साधला. याप्रसंगी अनिलदादांनी प्रभु येशू ख्रिस्तांना वंदन केले. धर्मगुरू यांनी अनिलदादांचा स्वागत सत्कार करून अनिलदादांना विजयासाठी शुभेच्छा आशीर्वाद दिले.

दरम्यान अनिलदादांनी उपस्थित ख्रिश्चन बांधव, भगिनींना बीडच्या सर्वांगीण विकासाकरिता येत्या 20 नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक 13 बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिल माणिकराव जगताप या नावाच्या शिलाई मशीन या निशाणीवर बटण दाबून मला प्रचंड मतांना विजयी करा असे आवाहन केले. याप्रसंगी अनिलदादांसोबत सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
°°°°°

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …