सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांचा स्तुत्य उपक्रम !
मुंबई येथील प्रणब कन्या संघ कन्या स्नेहालय बालिकाश्रमात पिंपळनेर येथील शिरसाट कुटुंबीयांनी केला त्विशाचा दुसरा वाढदिवस साजरा
मुंबई दि.०१ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे स्थायिक झालेले सिने दिग्दर्शक सुरज शिरसाठ यांनी आपली कन्या कु. त्विशा सुरज शिरसाट हिचा दुसरा जन्मदिन आज दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी मुंबई (नालासोपारा) येथील प्रणब कन्या संघ बालिकाश्रम येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी बालिकाश्रमातील बालिकांनी प्रार्थना,भक्ती गीते गाऊन त्विशा चे औक्षण केले. त्याचबरोबर सर्वांनी तिला भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. यावेळी शिरसाट कुटुंबीयांनी बालिकाश्रमातील मुलांना अन्नदान करून त्यांच्यासमवेत संपूर्ण दिवस आनंदाच्या आणि उत्साही वातावरणात घालविला. शिरसाट परिवारासमवेत बालिकाश्रमातील मुलांचा 2025 या नवीन वर्षाचा आजचा हा पहिला दिवस मोठा आनंदात गेला. या कार्यक्रमाला कु. त्विशा हिचे आजी-आजोबा सौ. मंदाकिनी विठ्ठल बालाजी शिरसाट आईवडील सौ.मीना सुरज विठ्ठल शिरसाट,काकी काका सौ. नंदा दिपक कडूदास मगरे हे उपस्थित होते.
सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांनी
आपल्या लाडक्या कन्येचा पहिला वाढदिवस बालिकाश्रमात साजरा केल्यानंतर यावर्षी पुन्हा आपल्या लाडक्या कन्येचा दुसरा ही
वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी बालिकाश्रमात वाढदिवस साजरा करण्याचा घेतलेल्या या निर्णयाचे स्तुत्य उपक्रमाचे त्यांच्या स्नेहीजन, नातेवाईक आणि मित्र परिवारांनी तोंडभरून कौतुक केले. यावेळी सिने दिग्दर्शक सुरज शिरसाठ यांनी समाजातील सर्व नागरिकांनी बालिकाश्रम अनाथ आश्रमातील मुलांसमवेत आपल्या लाडक्या मुलांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा आनंद द्विगणित करावा असे आवाहनही समाजातील नागरिकांना केले.