06/09/25
Oplus_131072

यशवंत विद्यालयाचे सोमनाथ गिते सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित! गिते सर यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

यशवंत विद्यालयाचे सोमनाथ गिते सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

गिते सर यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

बीड दि.13 (प्रतिनिधी ) – शहरातील यशवंत विद्यालयाचे शिक्षक सोमनाथ गीते सर यांना मातृभूमी प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार काल 12 जानेवारी रोजी माजी आमदार उषाताई दराडे, हभप राधाताई महाराज, हभप मोहन महाराज खरमाटे, समाजसेवक संजय कोठारी व इतर मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमनाथ गीते यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड द्वारा संचलित यशवंत माध्यमिक विद्यालय बीड येथे कार्यरत असलेले गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षक सोमनाथ गोपीनाथ गिते सरांनी आत्तापर्यंत शेकडो ग्रामीण भागातील गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. गिते सर नेहमी शाळेतील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपचे वर्ग घेऊन त्यांना स्कॉलरशिपसाठी पात्र केले. ते नेहमी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेसह सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. शाळाबाह्य उपक्रमामध्ये जबाबदारी व मार्गदर्शन करतात. गोर गरीब अनाथ मुलांना शालेय साहित्यासाठी मुले दत्तक घेतले आहे. अनेक वेळा रक्तदान करून सामाजिक भान जपले जोपासले आहे. आतापर्यंत गीते सरांनी विविध सामाजिक उपक्रमामध्ये हिरीहिरीने भाग घेतला आहे. नाथ सावली प्रतिष्ठान बीडच्या मार्फत अनाथ मुला मुलींना शिक्षणासाठी सहकार्य करणे अशा विविध उपक्रमात शैक्षणिक व सामाजिक उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांच्या कार्याची जिल्हा सह जिल्ह्याच्या बाहेरील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रामुख्याने त्यांना पुढील पुरस्कार मिळालेले आहेत.
रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार-2018, पद्मपाणी प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-2019, राज्यस्तरीय यशवंत रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार-2020, द स्कुल एक्सप्रेस तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार-2017, प्रो ऍक्टिव्ह एज्युकेशन लिमिटेड तर्फे बेस्ट अबॅकस टीचर अवार्ड-2022, ज़ी चॅम्प एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मराठवाड्यातील बेस्ट टीचर अवार्ड-2023, या सर्व गोष्टीची दखल घेऊन या वर्षी मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती. सदरील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी म्हणजे काल दिनांक 12 जानेवारी
2025 रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे माजी आमदार उषाताई दराडे, हभप राधाताई महाराज, हभप मोहन महाराज खरमाटे, समाजसेवक संजय कोठारी व इतर मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल
त्यांचे यशवंत विद्यालयाचे मुख्यध्यापक गणेश वाघ सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदासह विद्यार्थी विद्यार्थिनींनी मित्रपरिवारांनी अभिनंदन केले. सध्या सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
____________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …