06/09/25
Oplus_131072

जी चॅम्प अबॅकसचे आठ विद्यार्थी नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्डने सन्मानित* *मराठवाडा विभागीय अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गिते सरांना प्रदान*

जी चॅम्प अबॅकसचे आठ विद्यार्थी नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्डने सन्मानित

मराठवाडा विभागीय अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गिते सरांना प्रदान

बीड दि.02 (प्रतिनिधी )- छत्रपती संभाजीनगर येथे 01 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये बीड शहरातील धानोरा रॊड येथे सुरू असलेल्या
सोमनाथ गीते सरांच्या जी चॅम्प अबॅकस मधील आठ विद्यार्थ्यांनी नॅशनल अवॉर्ड मिळविला. या मध्ये दोन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण घेऊन यावर्षीचा जी चॅम्प स्टार अवॉर्ड फटकावला आहे. या
आठ विद्यार्थ्यांना नॅशनल कंपेटिशन अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर या वेळी या वर्षीच्या मराठवाडा विभागाचा अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड सोमनाथ गिते सरांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमनाथ गीते सर आणि यशस्वी झालेल्या आठ विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
बीड शहरातील धानोरा रॊड येथे गेली पाच वर्षांपासून यशस्वीपणे चालवत असलेल्या गिते सोमनाथ सरांच्या जी चॅम्प अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांनी
संभाजीनगर येथे 01 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल लेव्हलच्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा सात मिनिटात 100 गणिते सोडवण्यासाठी होती. या परीक्षेत मराठवाडा विभागातून 4 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या कॉम्पिटिशनमध्ये सोमनाथ गीते सरांच्या आठ विद्यार्थ्यांनी नॅशनल अवॉर्ड मिळविला. या मध्ये दोन विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण घेऊन यावर्षीचा जी चॅम्प स्टार अवॉर्ड पटकावला आहे. अबॅकस म्हणजे गणित नव्हे तर गणितातील क्रियांच्या उपयोग करून मुलांची बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी आणि मुलांचे कॉन्सन्ट्रेशन एकाग्र करण्यासाठी ब्रेन एक्झरसाइज आहे. त्यामुळे मुले एकाच वेळी आपली सर्व अवयव क्रियाशील ठेवतात त्यामुळे आपण जे पाहतो किंवा ऐकतो ते कायमस्वरूपी लक्षात ठेवण्याची क्षमता यामुळे विकसित होते. अबॅकस च्या एकूण आठ लेव्हल असतात प्रत्येक लेव्हल मध्ये बेसिक आणि ऍडव्हान्स गणितीय क्रिया कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट होण्यासाठी स्किल्स असतात. बौद्धिक क्षमता व एकाग्र क्षमता मुलांची वाढल्यामुळे मुले ज्या वर्गात शिकतात त्या वर्गातील सर्व विषय आत्मसात करण्यासाठी विविध कौशल्य विकसित होतात त्यामुळे मुलगा वर्गामध्ये नंबर एक राहतो. संभाजीनगर, डिव्हिजनल स्पोर्ट, इंदोर स्टेडियम गारखेडा येथे झालेल्या नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये एलकेजी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले. या कॉम्पिटिशन मध्ये श्रेयश आत्माराम वाव्हळ, माऊली आसाराम वाघमारे, शिवप्रताप विठ्ठल पवार,सार्थक विजय आमटे, शिवप्रसाद भुजंग मुंडे, जय हिंद सोमनाथ गीते यांना अनुक्रमे नॅशनल थर्ड आणि सेकंड रँक प्राप्त झाला असून या कॉम्पिटिशन मध्ये कौशिक राहुल खेमाडे, ईश्वरी वैजिनाथ धेंडुळे यांनी 100 पैकी 100 गुण घेऊन नॅशनल जि चॅम्प स्टार अवार्ड मिळवला आहे.हे सर्व यश गणित तज्ञ व विविध स्किल आत्मसात करणारे अबॅकस टीचर सोमनाथ गीते सरांना श्रेय जाते. त्यांनी मुलांची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतल्यामुळे यांना यावर्षीचा जी चॅम्प मराठवाडा विभागाचा बेस्ट अबॅकस टीचर अवार्ड G चॅम्प चे मॅनेजिंग डारेक्टर श्री योगेश अँड आरती देशामाने यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. यावेळी विशेष बाब म्हणजे सहभागी भक्ती चांगदेव चौरे, नंदिनी लक्ष्मण पोकळे, सई विठ्ठल पवार, काव्या राजेश राऊत, समर्थ प्रशांत मिसाळ, शिवदीप विठ्ठल पवार, आशिष चांगदेव चौरे, ओम विठ्ठल गुजर, प्रज्वल प्रल्हाद सानप, सत्यमेव प्रमोद सरपते, शिवतेज विजयकुमार गिरे, विराज नितीन हलकुडे, देवराज भारत नागरगोजे, दूर्वा भारत नागरगोजे, हे सर्व विद्यार्थी 75 प्लस गुण मिळवल्या मुळे त्यांना गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देण्यात आले. या सर्व यशस्वी मुलांचे नातेवाईक मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी कौतुक करून तोंड भरून कौतुक करत अभिनंदन केले. या यशाबद्दल गीते सरांचे व यशस्वी सर्व विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
____________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …