गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप
संत रविदास महाराज,कंकय्या महाराज,संत सेवालाल महाराज,छ.शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी
बीड दि.२० (प्रतिनिधी) गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडच्या वतीने संत रविदास महाराज, कंकय्या महाराज, संत सेवालाल महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती रोहीदास नगर बीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते मा. नगरसेवक जगदीश भैय्या गुरखुदे हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .जाधव साहेब , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानोबा माने, मिडिया पत्रकार श्री.हरिदास तावरे, गणेश गुजर , तसेच भूषण पवार, आनंद सरपते, जैन साहेब, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रविदास महाराज, कंकय्या महाराज, संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकांना संतांची विचारांची व ते विचार आचरणात आणण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या विचारांची बीजे रोवली गेली पाहिजेत यासाठीच संत , महात्म्यांच्या जयंती साजरी करणे आवश्यक असल्याचे विचार मान्यवरांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सुभाष गायकवाड व विलास बामणे यांनी केले. प्रास्ताविक करताना सुभाष गायकवाड म्हणाले की, शिक्षणामध्ये फार मोठी ताकद आहे विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी आयोजकाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही पेन शालेय साहित्य वाटप केले . यानंतर सर्व समाज बांधव यांच्या उपस्थितीत परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री किशोर आण्णा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानोबा माने तसेच राजु महुवाले,विलास बामणे सुभाष गायकवाड, हरी भोसले, विष्णू गायकवाड, कृष्णा मुने, किशोर गायकवाड, सुनिल माने,मनोज कांबळे,जीवन डोईफोडे, अविनाश माने,नदू गायकवाड, अशोक इंगळे,आकाश भालशंकर , आनंद गायकवाड, यांच्या अथक परिश्रमातून संत रविदास महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.