06/09/25

सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, शिक्षक आ. विक्रम काळे,फिल्म अभिनेता अली खान,अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या हस्ते सौ मुक्ता आर्दड मॅडम यांना ‘शिक्षण रत्न पुरस्कार’ प्रदान! सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव!

सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, शिक्षक आ. विक्रम काळे,फिल्म अभिनेता अली खान,अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या हस्ते सौ मुक्ता आर्दड मॅडम यांना ‘शिक्षण रत्न पुरस्कार’ प्रदान!

सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव!

बीड दि.6 (प्रतिनिधी)-

एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातून शैक्षणिक कार्याच्या गौरवार्थ दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार” राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, शिक्षक आ. विक्रम काळे, मा.आ.रामरावजी वडकुते, प्रसिद्ध अभिनेत्री पवित्र रिश्ता फेम उषा नाडकर्णी, फिल्म अभिनेता अली खान
एकता सेवाभावी संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष अझहर खान या मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या मराठवाडा महिला सचिव तथा श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ. मुक्ता दिगंबर आर्दड (मोटे) मॅडम यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ मुक्ता आर्दड (मोटे) मॅडम यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुंबई येथील एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. यावर्षी शैक्षणिक क्षेत्रातून दिला जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या मराठवाडा महिला सचिव तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या गेवराई तालुकाध्यक्षा तसेच श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ. मुक्ता दिगंबर आर्दड (मोटे) मॅडम यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी दिलेला लढा आता पर्यंत केलेले विविध आंदोलन, गोरगरीब विद्यार्थ्यांना केलेली मदत या सर्व बाबींची दखल घेऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान सदर पुरस्काराचे वितरण दि.२० मे २०२५ मंगळवार रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान महानगरपालिका मार्ग मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या शानदार सोहळ्यात सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे, मा.आ.रामरावजी वडकुते, एकता सेवाभावी संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष अझहर खान,प्रसिद्ध अभिनेत्री पवित्र रिश्ता फेम उषा नाडकर्णी, फिल्म अभिनेता अली खान या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सौ. मुक्ता दिगंबर आर्दड (मोटे) मॅडम यांना सदरील शिक्षक रत्न पुरस्कार
देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.मुक्ता दिगंबर आर्दड (मोटे) मॅडम यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व मा.आ. श्री अमरसिंह पंडित, जय भवानी शिक्षण संस्थेचे सचिव जयसिंह पंडित व गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री विजयसिंह पंडित, शारदा क्रिडा अकॅडमीचे संचालक श्री रणवीर काका पंडित व गेवराई तालुक्याचे युवा नेतृत्व श्री पृथ्वीराजे (बाळ दादा) पंडित तसेच उत्तरेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव श्री गोपीनाथ घुले, म.राज्य विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे सर यांच्यासह बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीचे पदाधिकारी, श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शारदा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र जगदाळे, मुख्याध्यापक मुरलीधर पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
_______________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …