06/09/25

अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या कार्याचा थोर सन्मान

अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या कार्याचा थोर सन्मान

बीड दि.२९(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार शनिवार दि.२८ रोजी भव्य दिव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील पहाट फाउंडेशन ही सामाजिक कार्यात कार्यरत असलेली प्रतिष्ठित संस्था असून, ती दरवर्षी महाराष्ट्रभरातून समाजसेवेतील उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सन्मान करते. यंदा अँड. राज पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
राज पाटील हे वडवणी तालुका विकास समिती, उतराई महोत्सव आणि लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या माध्यमातून निसर्गसंवर्धन, जलसंधारण, शेती रस्ते, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य व आरोग्यविषयक साहित्य पुरवण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. त्यांनी आजपर्यंत हजारो वृक्षांचे वाटप केले असून, समाजात रक्तदानासह अवयव दान व मरणोत्तर देहदान जनजागृती सोबत, स्वतः ५० वेळा रक्तदान केले आहे, २७ वेळा रक्तदान शिबिर आयोजन व अवयव दान, मरणोत्तर देहदान फॉर्म भरला आहे.
गावचे सरपंच म्हणून कार्य करताना त्यांनी सरपंच परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून शेकडो सरपंचांच्या समस्या मांडून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांसाठी, शेती रस्ते व जलसंधारणाच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या लढ्यातही गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा बुलढाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे शनिवारी दुपारी दोन वाजता अत्यंत थाटामाटात पार पडला. या वेळी इको फ्रेंडली व्हिलेजचे निर्माते तथा सलाई बनचे संस्थापक श्री. मनजीत सिंग सिख, लोणार-मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, मिसेस इंडिया विजेत्या श्वेता परदेशी, बुलढाणा पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष रणजीत सिंह राजपूत, प्राचार्य हरीश साखरे, मोगरा फुलला फेम सचिन देवरे आणि कृषी समृद्धी फाउंडेशनचे महेंद्र सौभागे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अंभरून गावात वृक्षारोपण, बस स्टँड येथे पथनाट्य व राज्यस्तरीय, पर्यावरण परिषद, पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पहाट फाउंडेशनचे संचालक अमोल भिलंगे, संचालिका अर्पिता सुरडकर, संचालक सोमनाथ चौधरी आणि त्यांच्या कार्यतत्पर टीमने विशेष परिश्रम घेतले.

हा पुरस्कार टीमवर्कचा- राज पाटील

आम्हाला आतापर्यंत अनेक पुरस्कार राज्यातील विविध भागांमध्ये मिळालेले आहेत. हे सर्व पुरस्कार केवळ माझ्या स्वतःच्या कामाचे नसून माझ्यासोबत अविरत काम करणाऱ्या लढा दुष्काळाशी टीमच्या प्रयत्नांचे फळ आहे. माझ्या सोबतच्या सर्व टीम मुळेच हे सर्व काम आम्ही वेळेवर करू शकलो, माझ्यासोबत समस्त सामाजिक क्षेत्रात काम करणारा मित्रपरिवार, वडवणी व बीड जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणारा मित्रपरिवार या सर्वांच्या अथक प्रयत्नाने व सहकार्याने आम्ही जिल्ह्यासह राज्यात सामाजिक प्रश्नावर काम करत असतो, हे श्रेय सर्वांचे असल्याने हा पुरस्कार मित्रपरिवाराला समर्पित केल्याचे राज पाटील यांनी संघर्ष यात्रा परिवाराशी बोलताना सांगितले.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …