‘अभि नहीं तो कभी नहीं’ हे लक्षात ठेवून आझाद मैदानावरील आंदोलनात बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!
बीड दि.२२(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्प्यासाठी लागणारा निधी मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती महाराष्ट्र राज्य व शिक्षक समन्वय संघाचे 05 जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. तसेच बुधवार दि.02 जुलै रोजी शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशानुसार निधी उपलब्ध करून द्या या मागणीचे निवेदन दिले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक व पदवीधर आमदारा सोबत तात्काळ निधी संदर्भात बैठक घेऊन मार्ग काढु सांगितले आहे. त्यामुळे सर्व आमदार त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे आंदोलनस्थळी शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची गरज आहे. तसेच शिक्षक समन्वयक संघाने 8 व 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळा बंद करून मोठ्या संख्येने आंदोलनाला उपस्थित रहावे असे आवाहन विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे सर, मराठवाडा निरिक्षक विजयसिंह शिंदे सर, छत्रपती संभाजी नगर विभाग कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे सर, मराठवाडा छत्रपती संभाजी नगर विभागाचे संघटक पंकज कळसकर सर, मराठवाडा महिला सचिव श्रीमती मुक्ता आर्दड (मोटे) मॅडम बीड जिल्हाध्यक्ष श्री आत्माराम वाव्हळ सर यांनी केले आहे.
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वाढीव टप्प्याच्या वेतनासाठी दिनांक १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी तात्कालीन राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन या संदर्भातला शासननिर्णय ही काढला आहे. परंतु सलग नवीन सरकारचे तीन अधिवेशन झाली. या अधिवेशना दरम्यान वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद मात्र झालेली नाही. त्यामुळे हजारो शिक्षकांचा हिरमोड झाला. विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा अनुदानासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करावी या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघाचे 05 जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या हक्काचे वेतन पदरात पाडून घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विना अनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे सर, मराठवाडा निरिक्षक विजयसिंह शिंदे सर, छत्रपती संभाजी नगर विभाग कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे सर, मराठवाडा छत्रपती संभाजी नगर विभागाचे संघटक पंकज कळसकर सर, मराठवाडा महिला सचिव श्रीमती मुक्ता आर्दड (मोटे) मॅडम बीड जिल्हाध्यक्ष
श्री आत्माराम वाव्हळ सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. प्रताप पवार सर, उपाध्यक्ष श्री. रामदास जामकर सर ,उपाध्यक्ष श्री. अरविंद सौंदलकर सर,
जिल्हा सचिव श्री. शेख सर जिल्हा संघटक
प्रताप देशमुख सर, जिल्हा सहसंघटक श्री.बाळासाहेब नागरगोजे सर, महिला उपजिल्हा अध्यक्षा दैवशाला मुंढे मॅडम, महिला सचिव सुरेखा गायकवाड मॅडम बीड तालुका अध्यक्ष श्री. भागवत यादव सर, गेवराई तालुका अध्यक्ष श्री. दीपक गरूड सर, आष्टी तालुका अध्यक्ष श्री. रविंद्र भुकन सर,पाटोदा तालुका अध्यक्ष श्री. अंकुश गवळी सर,शिरूर तालुका अध्यक्ष श्री. दशरथ साबळे सर,माजलगाव तालुका अध्यक्ष श्री. चंद्रशेखर तौर सर, वडवणी तालुका अध्यक्ष श्री. वैजनाथ शिंदे सर ,परळी तालुका अध्यक्ष श्री गोविंद आघाव सर , धारूर तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मुंडे यांच्या सह जिल्हा विविध पदाधिकारी यांनी केले आहे.
_______________________________________________________________