06/09/25

श्री व्यंकटेश पब्लिक स्कुलमध्ये आषाढी निमित्त विठ्ठल दिंडीचे आयोजन

श्री व्यंकटेश पब्लिक स्कुलमध्ये
आषाढी निमित्त विठ्ठल दिंडीचे आयोजन

बीड दि.५(प्रतिनिधी)- शहरातील आदित्य नगरी भागात असलेल्या श्री व्यंकटेश पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी सणानिमित्त विठ्ठल दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील छोट्या बालकांना विठ्ठल रुक्माई ची वेशभूषा केल्याने दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक पालकात मोठा उत्साह संचारला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
बीड शहरातील आदित्य नगरी भागात असलेल्या श्री व्यंकटेश पब्लिक स्कूल मध्ये शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी सणा निमित्त विठ्ठल दिंडी आयोजित करण्यात आली होती. दिंडीच्या सुरूवातीला प्राचार्य श्री आर.एम. हावळे सर आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. धुमाळ सर यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. त्यानंतर पायी दिंडी सोहळा आदित्य नगरी परिसरातुन मोठ्या उत्साहात करण्यात आली. या दिंडीत शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनींनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती. या वेळी विठु माऊलीचा जयघोष करत सर्व विद्यार्थी दिंडीत उत्साहाने चालत होते. दिंडीतील सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांनी माऊली माऊली…विठ्ठल विठ्ठल…या गितावर नृत्य केले. या पायी दिंडीचा समारोप विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये करण्यात आला. या दिंडीमध्ये पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …