संकेत संदीप राक्षे यांचा वाढदिवस
समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा!
पुणे दि.07(प्रतिनाधी)- शहरातील भोसरीचे युवा उद्योजक व समाजसेवक संकेत संदीप राक्षे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांशी नाळ जोडत, निसर्ग आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत, त्यांनी वाढदिवस साजरा न करता ‘समाजासाठी देणगीचा दिवस’ म्हणून स्मरणात राहील अशी कृती केली. अंधशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची उधळण. संकेत राक्षे यांनी सर्वप्रथम पांजरपोळ अंधशाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांची भेट घेतली. तेथील अंध बालकांसोबत संवाद साधताना त्यांच्या डोळ्यांत आनंद व आत्मीयतेचा झळकणारा प्रकाश दिसून येत होता. त्यांनी त्या विद्यार्थ्यांना ताज्या फळांचे वाटप केले. हा छोटासा उपक्रम असला, तरी त्यातून त्यांनी “सामाजिक संवेदनशीलतेचा प्रकाश” पसरवण्याचा प्रयत्न केला. वृक्षसंवर्धनासाठी १०० देशी झाडांचे योगदान. निसर्गाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने, संकेत राक्षे यांनी वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘अमृतानुभव फाऊंडेशन’ या संस्थेला शंभर देशी झाडांचे रोप भेट दिले. साग, करंज, आवळा, बहावा, अशा पर्यावरणपूरक व औषधी गुणधर्म असलेल्या देशी वृक्षांची निवड करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सजग पाऊल उचलले आहे. ग्रामीण शिक्षणासाठी LCD टीव्हीची भेट. संकेत राक्षे वंचितांशी असलेली नाळ जपत रतनवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील प्राथमिक शाळेला LCD टीव्ही भेट म्हणून दिला. ग्रामीण भागात आधुनिक शिक्षणसाधनांची कमतरता लक्षात घेता, विद्यार्थ्यांना दृश्यश्राव्य माध्यमांतून शिकण्याची संधी मिळावी, या हेतूने त्यांनी ही भेट दिली आहे.
शरद पवार साहेबांकडून कौतुक आणि शुभेच्छा! संकेत राक्षे यांच्या सामाजिक कार्याची दखल देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यांनी संकेत यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. युवांमध्ये समाजभान जागवणारा हा प्रेरणादायी दृष्टिकोन नेतृत्त्वासाठी आशादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. संकेत राक्षे एक संवेदनशील नेतृत्वाचा नवा चेहरा, संकेत राक्षे हे केवळ व्यवसायात यशस्वी झालेले उद्योजक नाहीत, तर आपल्या यशाचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येईल, याचा सातत्याने विचार करणारे युवक आहेत. अंधशाळा, पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित उपक्रम राबवून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा हा “समाजमाणूस” म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न निश्चितच इतर तरुणांसाठी आदर्शवत ठरावा, वाढदिवसानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील मंडळींनी संकेत यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.