अवैध रिक्षा चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेची मोठी कारवाई; 40 रिक्षा ताब्यात
30 हजार रुपयांचा ठोठावला दंड
बीड दि 20(प्रतिनिधी)- सध्या अवैध वाहतुक करणार्यांना बीड पोलीसांचा चांगलाच धाक बसला असून कोणत्याही वाहनचालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसू नयेत अन्यथा कारवाई अटळ आहे असा इशाराच जणू पोलीस अधिक्षक नवनीत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन यांनी व जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी सुभाष, पोलीस उपनिरीक्षक विजय यांनी अवैध वाहतुक करणार्यांना दिला आहे ज्याचाच भाग म्हणून काल दि.19 जुलै 2025 शनिवार रोजी सकाळपासून दिवसाअखेरपर्यंत 40 अवैध रिक्षा ताब्यात घेवून 30 हजार रुपयांचा रोख दंड ठोठावला आहे यामुळे रिक्षाचालकांसह वाहतुकीचे नियम मोडणार्या सर्वांवर याचा जरब बसला आहे.
बीड जिल्ह्यासह बीड शहरात दिवसभरात 10 हजाराच्या वर वाहने ये-जा करत असतात त्यात रिक्षांची संख्या भली मोठी आहे असे अनेक रिक्षाचालक विनाकागदपत्रे रिक्षा चालवतात यांच्याकडे कागदपत्रे परिपुर्ण स्वरुपात आहेत की नाही याची शहानिशा करण्यासाठी जिल्हा वाहतुक शाखेचे पो.उप.नि विजय यांनी व त्यांच्या टीमने सकाळी 10 वाजल्यापासून रिक्षाचालकांची कागदपत्रांची वाहतुक शाखेकडून कागदपत्रे पाहण्यास सुरुवात केली यामध्ये अनेक रिक्षाचालकांकडे लायसन्स, इन्शुरन्स व गाडीचे कागदपत्र नव्हते त्यामुळे 40 रिक्षांवर कारवाई करण्यात आली व रोख 30 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. तरी जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी सुभाष यांनी रिक्षा चालकांसह सर्व वाहनधारकांनी आपले वाहनाचे कागदपत्रे, इन्शुरन्स, आरसीबुक, पीयुसी, ड्रायव्हींग लायसन्स परिपुर्ण करुन जवळ ठेवण्याचे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या मोहीमेत जिल्हा वाहतुक शाखेचे पो.उप.नि.विजय, सोबत पोलीस हवालदार त्रिंबक, ज्ञानेश्वर, राजाभाऊ, पोलीस अंमलदार वसीम, सिद्धार्थ, चिंतामणी, पोलीस नाईक अजिनाथ इत्यादींनी मोहीमेमध्ये सहभाग घेतला.