06/09/25

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे

बीड दि.२१(प्रतिनिधी): परळी येथील महादेव मुंडे हत्याकांड प्रकरण तापू लागले असून आता या प्रकरणात खा.बजरंग सोनवणे यांनी लक्ष घातले आहे. चार दिवसांपुर्वी त्यांनी मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांना ‘मी भाऊ म्हणून पाठिशी उभा राहिल’ असा शब्द दिला होता. आज सोमवार दि.२१ जुलै रोजी त्यांनी मुंडे हत्यांकाड प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.दिल्ली येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, काल बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात आ.धनंजय मुंडे यांनी २०० दिवसानंतर बोलत असल्याचा उल्लेख केला. परंतु त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना बोलता येत नसावे. त्यांना अजून चांगले बोलता यावे. पण त्यांच्या बोलण्याचा राजकिय अर्थ होता. त्यांनी गप सहन केल्याचे म्हटले. माझं त्यांच वैयक्तीक वैर नाही, आम्ही वेगवेगळ्या राजकिय प्रवाहात आहोत. बीडच्या मातीच्या बदनामी बद्दल धनंजय मुंडे यांनी उल्लेख केला पण अख्या देशाला देखील माहित आहे की बीडची बदनामी केली. त्यांनी काही डायलॉगही मारले. त्यांची ती स्टाईल आहे. बीडची बदनामी ही खंडणीखोर, वाळूचोर, संस्था नावावर करून घेणारे, प्रॉप्रट्या हडपणाऱ्यामुळे झाली आहे. हे कोण आहेत, याचाही तपास व्हावा, अशी मागणीही खा.सोनवणे यांनी केली. दरम्यान, स्व.संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी अद्याप सापडत नाही. या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यावर हे प्रकरण थांबत नसून यात अनेक लोक आहेत. यांची शंभर ते दिडशे लोकांची टोळी आहे. आजही लोकांवर त्यांच्याकडून अन्याय सुरू आहे. तर महादेव मुंडे हत्याकांड प्रकरण हे बीडसाठी शर्मेची बाब आहे. देशमुख प्रकरणात अजून आरोपी अटक करायचे आहेत, त्यातच हे महादेव मुंडे प्रकरण पुढे आलेले आहे. मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे न्यायासाठी एसपींना भेटल्या. पण तपास होत नाही, म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यादिवशी मी दिल्लीत होतो, परंतु मी पुन्हा बीडला गेलो आणि ज्ञानेश्वरीताईंना भेटलो. यावेळी त्यांना तुमच्या लढ्यात सहभागी असल्याचा शब्द दिला आहे. यामुळे या प्रकरणात आपण अमित शहांना भेटणार आहोत, असेही खा.बजरंग सोनवणे म्हणाले.

चौकट

रेल्वेचे काम माझ्या कार्यकाळात सोलापूर-धाराशीव-संभाजीनगर- धुळे अशा रेल्वेमार्गाच्या कामांसाठी सर्व्हेसाठी निधी मिळालेला आहे. डिपीसीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेसाठी सहकार्य करू, असा शब्द दिलेला आहे.

महाराष्ट्राच्या हिताचे काम न करणाऱ्यांना मंत्र्याना बडतर्फ केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेवून त्यांनी चुकीचे वागणाऱ्यांना सरळ करण्यासाठी सत्तेचा वापर करावा. कृषी मंत्री कोकाटे हे पदावर बसल्यापासून पाच वेळा शेतकऱ्यांचा अपमान करतात. अशा पध्दतीने शेतकऱ्यांना बोलणे योग्य नाही. महाराष्ट्रात काय सुरू आहे, हे सत्ताधाऱ्यांनाच विचारले पाहिजे.

 

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …