*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट*
*सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी*
बीड दि.२५ (प्रतिनिधी): सावकारीच्या महाभयानक अत्याचारातून अनेक वर्ष होरपळून निघत असलेल्या फटाले कुटुंबीयांची बीड शहर बचाव मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मयत झालेले राम फटाले यांचे मोठे चुलते ज्येष्ठ पत्रकार द्वारकादास फटाले हे ही उपस्थित होते.
यावेळी फटले कुटुंबीयांनी मागील अनेक वर्षापासून पेठ, बीड टकारवाडा भागातील महाभयानक , क्रूरतेचा कळस असलेल्या व महाअत्याचारी सावकार कुटुंबीयांच्या जाळ्यात कशा पद्धतीने अडकत गेलो व त्यांनी अनेक वर्षांपासून कशा पद्धतीने शोषण केले याचा पाढा वाचला. तसेच अनेक वेळेस राम फटाले यांना व्याजाच्या पैशापोटी दिवस-दिवस सावकाराने घरात कोंडून ठेवून अमानुषपणे मारहाण केल्याची माहिती त्यांचे वडील, चुलते व भाऊ यांनी सांगितली. शिवाय 2021 -22 च्या लॉकडाऊन काळातही या सावकाराला मुद्दल व्याजासह पैशाची परतफेड करूनही तारण ठेवलेले चेक , बॉण्ड्स इतर कागदपत्रे हा परत देत नव्हता व आज पर्यंत परत दिलेली नाहीत. सतत व्याजाच्या पैशासाठी राम फाटले यांच्यासह घरातील महिलांना शिवीगाळ करणे,
जिवे मारण्याच्या धमक्या देऊन मोठा त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्याने फटाले यांनी आत्महत्या करून जीवन संपविले असल्याचे सांगितले. यावेळी फटाले कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचाने आम्ही तुमच्या पाठीशी तुम्हाला न्याय मिळेल पर्यंत खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. यावेळी बीड शहर बचाव मंचाचे कायदेशीर सल्लागार ॲड.अनिलजी बारगजे यांनी या कुटुंबीयांचे वकीलपत्र एक रुपया न घेता स्वखर्चाने स्वीकारले आहे.
तरी पोलीस विभागाने या प्रकरणाची सखोल व योग्य पद्धतीने तपास करून
पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालू नये अशी मागणी बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष नितीनजी जायभाये,आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव येडे, इंटक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, बचाव मंचचे मार्गदर्शक सुधीरभाऊ देशमुख, संपादक पत्रकार बालाजी जगतकर आदी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली आहे.