06/09/25

*सेवा निवृत्तीनंतरही शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी अहोरात्र काम करणार* शिक्षक नेते श्रीराम बहीर यांची ग्वाही

*सेवा निवृत्तीनंतरही शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी अहोरात्र काम करणार*

शिक्षक नेते श्रीराम बहीर यांची ग्वाही

बीड दि.२ (प्रतिनिधी):
शिक्षकाच्या विविध प्रश्नासाठी झटणारे शिक्षकनेते म्हणून श्रीराम बहीर यांची ओळख आहे. बहीर यांनी शिक्षक संघटना आणि शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले. सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमास प्रचंड मोठ्या संख्येने शिक्षण आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे त्यांच्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी केले.
सर्वांच्या सहकार्यामुळे शिक्षक संघटना, शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक यशस्वीपणे काम करू शकलो. सेवानिवृत्ती नंतर यापुढे शिक्षकांच्या प्रश्नासाठी अहोरात्र काम करणार करणार असल्याची ग्वाही यावेळी श्रीराम बहीर यांनी दिली.
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि शिक्षक नेते श्रीराम बहिर यांच्या सेवापुर्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन 31 जुलै 2025 रोजी बीड येथे आयोजित केले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रभुदय मुळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक भगवान फुलारी, सी ए.बी. बी. जाधव, बबनराव गवते, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, गट शिक्षणाधिकारी समंदर खान, आदींची यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना श्रीराम बहीर यांनी, आपल्या सेवेच्या काळात आणि शिक्षक संघटना व पतसंस्थेच्या कार्यकाळात सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. यापुढील काळात शिक्षण शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आपण यापुढेही काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते अशोक हिंगे यांनी श्रीराम बहिर यांच्या कार्यकर्तृत्वा विषयी गौरवोद्गार काढले.
यावेळी कल्याणकाका आखाडे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की सहकारातील उत्तम संस्था कशी असावी हे, श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून श्रीराम बहीर यांनी दाखवून दिले आहे त्यांच्या आदर्शवत कार्यांचा इतरांनीही आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी श्रीराम बहीर यांच्या श्रीमती भगिनी इंदुबाई ज्ञानोबा जगदाळे आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या, श्रीराम यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून सामाजिक क्षेत्रात अनेकांचे संसार उभे करण्यासाठी आणि शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्य केले. त्यांच्या कार्याचा मला अभिमान वाटतो. याप्रसंगी बोलताना श्रीराम बहिर यांच्या पत्नी सौ. गिरिजा श्रीराम बहिर म्हणाल्या, सावलीप्रमाणे आपण त्यांच्या मागे उभा राहिले. घरापेक्षा त्यांनी शिक्षक, संघटना आणि पतसंस्थेच्या कामाला अहोरात्र प्राधान्य दिले. याप्रसंगी ॲड.विवेकानंद सानप, श्रीमती वनमाला कवडे, धर्मराज रसाळ, यांची समायोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कवचट, मानद सचिव विजय खोसे, खजिनदार पोथरकर जितेंद्र, सुमंत खांडे, शिवनाथ मेहत्रे, श्रीमती सुमित्रा अडसूळ, श्रीमती मनीषा मुंडे, श्री गोविंद वायकर, भगवान पवार, विक्रम राऊत, विजयकुमार समुद्रे, आदींसह पतसंस्थेचे कर्मचारी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन, पदाधिकारी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम वनवे यांनी तर आभार प्रदर्शन सुमंत खांडे यांनी केले.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …