*अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावेत- प्रा. बबनराव आंधळे*
*बीड दि.४(प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून अकरावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून यामध्ये विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश ऑनलाईन घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अकरावीच्या कला शाखेसाठी पूर्वीप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे सर यांनी केली आहे. जे कनिष्ठ महाविद्यालय पाहिजे ते मिळत नाही. कला शाखेचा तुकडीचा विचार केला तर प्रवेश खूपच कमी प्रमाणात झालेले आहेत. एक तर विद्यार्थी कला शाखेत प्रवेश घेण्यास जास्त इच्छुक नसतो. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून विद्यार्थ्याला प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले तरी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे शक्य नाहीत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आरक्षणानुसार प्रवेश आहे कला शाखेला ऑनलाइन प्रक्रियेतून शिक्षण विभागाने सूट द्यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांचे कला शाखेमध्ये प्रवेश होतील तसेच या शाखेला अध्यापनाचे कार्य करणारे प्राध्यापक वर्ग ही अतिरिक्त होणार नाहीत. तसेच विज्ञान शाखेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या भागात आहेत त्या ठिकाणीच त्यांना प्रवेश मिळणे आवश्यक आहे. त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे बाहेर शहराच्या ठिकाणी प्रवेश घेणे शक्य होत नसल्यामुळे बरेच विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी ग्रामीण भागात ज्या ठिकाणी स्थानिक चे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणीच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे व ग्रामीण युवक संघटनेच्या मागणीचा विचार करावा असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केले आहे.