06/09/25

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री ‌अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री ‌अजित पवारांचे आभार !

14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी

बीड दि.७(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित दादा पवार हे दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे
आणि बीड जिल्हा अध्यक्ष आत्माराम वाव्हळ यांनी भेट घेऊन सर्वप्रथम त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांचे मनस्वी आभार मानले. शिवाय 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करून सप्टेंबर मध्ये सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करावा अशी विनंती केली. यावेळी अजित दादा पवार यांनी हसून सरकार सकारात्मक असून बोलल्याप्रमाणे सर्व शिक्षकांच्या खात्यात ऑगस्ट पेड सप्टेंबर पगार जमा होईल असे सांगितले. यावेळी शिक्षकांचे लाडके आ. विक्रम काळे आणि गेवराई विधानसभेचे आ. विजयसिंह पंडित उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित दादा पवार हे 6 आणि 7 ऑगस्ट या दोन दिवसासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज 7 ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदे दरम्यान शिक्षकांचे लाडके आमदार विक्रम काळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे आणि
बीड जिल्हा अध्यक्ष आत्माराम वाव्हळ यांनी ना. अजित पवार यांची भेट घेतली.
प्रथम पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करून लागणाऱ्या 970 कोटी रुपयाची तरतूद केल्याबद्दल मनस्वी आभार मानले.
यावेळी बोलताना जितेंद्र डोंगरे आणि आत्माराम वाव्हळ यांनी 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत, लवकरात लवकर अनुदान वितरणाचा शासन आदेश काढून आपण मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षक आंदोलनात प्रसंगी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ऑगस्ट पेड सप्टेंबर या प्रमाणे राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करावा अशी विनंती केली. यावेळी अजित दादा पवार यांनी हसत आमचं सरकार बोलल्याप्रमाणे राज्यातील सर्व विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांच्या खात्यात ऑगस्ट पेड सप्टेंबर पगार जमा होईल असे सांगितले. यावेळी शिक्षकांचे लाडके आ. विक्रम काळे, गेवराई विधानसभेचे आ. विजयसिंह पंडित आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …