*”एक राखी धर्मरक्षेची..”*
*धर्म जागरण मंचाच्या गीतांजली देसाई यांनी आ. संजय केणेकर यांना बांधली धर्मरक्षेची राखी.*
बीड दि.१२ (प्रतिनिधी) -बीड शहरात विविध कार्यक्रमांच्या व बैठकांसाठी आलेले भाजपचे प्रदेश महामंत्री व हिंदुत्ववादी नेते आ. संजय केणेकर साहेब यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढत भगिनींशी संवाद साधत रक्षाबंधन साजरा केला. यावेळी “एक राखी धर्मरक्षेची” याप्रमाणे लव जिहाद विरोधी कायद्याची ओवाळणी म्हणजे हिंदू भगिनींसाठी खरी धर्मरक्षणाची राखी आणि त्यांच्या सुरक्षिततेचे, सन्मानाचे व रक्षणाचे वचन असल्याचे महिलांनी आ. संजयजी केणेकर साहेबांना हिंदू धर्म जागरण मंचाच्या महिला संयोजिका सौ. गीतांजली ताई देसाई – डोरले यांनी सांगितले.
यावेळी भाजपच्या संध्याताई राजपुत, शिवसंग्राम जिल्हाप्रमुख गीतांजलीताई देसाई, सौ चौहानताई सह हिंदू संघटनांच्या महिला पदाधिकारी आणि भगिनींनी औक्षण करत, रक्षाबंधनाच्या माध्यमातून हा संदेश दिला की, धर्मरक्षण हाच हिंदूंसाठी पवित्र संकल्प आहे. लव जिहादसारख्या विकृत प्रवृत्तींपासून हिंदू भगिनींचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या अस्तित्व, संस्कृती व धर्म यांचे रक्षण करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी आणि सामाजिक जागृती ही काळाची गरज आहे. या हेतूने आ. संजय केणेकर साहेब यांनी घेतलेला धर्मरक्षणाचा संकल्प हा आपल्या हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा, परंपरेचा आणि भविष्याचा आधार आहे, जेव्हा धर्म आणि संस्कृतीवर आघात होतो, तेव्हा प्रत्येक हिंदूने एकजूट होऊन त्याच्या रक्षणासाठी उभे राहिले पाहिजे. हिंदू भगिनींचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वाभिमान हेच खऱ्या अर्थाने हिंदू समाजाची ताकद असल्याचे यावेळी म्हटले आहे.