06/09/25

फॅशन शोमध्ये शौर्यची कामगिरी बीडमध्ये तुलसी समूहाकडून चॅम्प ऑन रॅम्प स्पर्धा

फॅशन शोमध्ये शौर्यची कामगिरी

बीडमध्ये तुलसी समूहाकडून चॅम्प ऑन रॅम्प स्पर्धा

बीड दि.१७ (प्रतिनिधी)- देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन यांच्या वतीने रविवारी (दि.१७ ऑगस्ट) चॅम्प ऑन रॅम्प या राज्यस्तरीय लहान मुलांच्या फॅशन शोचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून लहानग्या स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅम्पवरच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून प्रत्येकाने आपले कौशल्य दाखवले.
याच स्पर्धेत तुलसी इंग्लिश स्कूलचा शौर्य सुनील डोंगरे या लहानग्या स्पर्धकाने ३ ते ६ वयोगटात थेट टॉप-५ मध्ये स्थान मिळवत राज्य पातळीवर बीडचा झेंडा फडकावला. शौर्यच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तुलसी एज्युकेशनचे संचालक प्रा. प्रदीप रोडे यांच्या संकल्पनेतून चॅम्प ऑन रॅम्प सिजन एक ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यावेळी आयकर विभागाच्या उपआयुक्त श्रीमती नितीका विलास, “चला हवा येऊ द्या” फेम प्रसिद्ध विनोदी अभिनेते अंकुर वधावे, तुलसी महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती दीपा रोडे यांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांनी शौर्यच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे आणि मिळालेल्या यशाचे कौतुक केले.
तुलसी इंग्लिश स्कूलच्या यूकेजी वर्गाच्या शिक्षिका फातिमा शेख यांनी विद्यार्थ्यांची अतिशय उत्तम तयारी करून घेतली होती. प्राचार्या उमा जगतकर, शिक्षिका फातिमा शेख तसेच शौर्यचे आई-वडील यांच्या सततच्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले. शौर्यने आपल्या नैसर्गिक आकर्षक व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास व प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. शौर्यच्या पुढील शैक्षणिक व कलागुणांच्या प्रवासासाठी सर्व स्तरातून त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …