- मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ हे राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानीत
बीड दि.१८( प्रतिनिधी )-
येथून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आत्माराम वाव्हळ यांना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनी ‘जिजाऊ रत्न विशेष मुख्याध्यापक पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.
दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षी प्रजासत्ताक दिनी डॉ.आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘जिजाऊ रत्न विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या पत्रकार, डॉक्टर, वकील, शिक्षक, शिक्षण, कला, शेती, क्रीडा, उद्योग, सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते या क्षेत्रात काम करणाऱ्यांना ‘जिजाऊ रत्न’ पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तिना जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या मध्ये पत्रकार तथा शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आत्माराम वाव्हळ यांना “जिजाऊ रत्न विशेष मुख्याध्यापक पुरस्कार” सर्वश्री दादासाहेब मुंडे, ह.भ. प. रंधवे बापू पोलीस निरीक्षक भारत माने, सत्यभामाताई बांगर, श्रीमती रुचिता मलबारी, शेख तय्यब, एस .बी .सय्यद, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सय्यद उस्मानिया,श्रीमती हेमाताई पिंपळे, हरिदास तावरे,दत्ता नलावडे, संपादक अबुबकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक श्री आत्माराम वाव्हळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
