अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा — बापूसाहेब साळुंखे
बीड दि.१९(प्रतिनिधी) — बीड जिल्ह्यामध्ये पाठीमागच्या काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी सर्जन्य पाऊस झालेला असून या पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे. तरी तलाठी व इतर कर्मचारी यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून अहवाल प्रशासनाकडे सादर करावेत व प्रशासनाने तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे विनंती मराठा महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे यांनी केली आहे.
जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी सृजन्य पाऊस झाल्या कानाने उभी पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी सदरील पिकांची तातडीने पाहणी करून पंचनामे करत त्या शेतकऱ्यांना प्रशासनाने व शासनाने तात्काळ आर्थिक हातभार लावावा असे विनंती मराठा महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे यांनी केली आहे.