06/09/25

बीडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांना पीएचडी प्रदान सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!

बीडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांना पीएचडी प्रदान

सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!

बीड दि.२२(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद रामदास शिंदे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पीएच डी ही पदवी प्रदान करण्यात आली. पीएचडी मिळाल्या बद्दल मिलिंद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद रामदास शिंदे यांचे हे पाटोदा तालुक्यातील निरगुडी मूळ गाव आहे. त्यांचे वडील रा.जा. शिंदे हे बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत अधिकारी पदावर कार्यरत होते. पुढे त्यांनी कायद्याची पदवी घेऊन अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान अभिनेता मिलिंद शिंदे हे अनेक वर्ष बीडच्या बीअँड सी क्वार्टर मध्ये वास्तव्य करत होते. त्यामुळे बीड जिल्ह्यासह शहराची खडा ना खडा माहिती अभिनेते मिलिंद शिंदे यांना आहे. अभिनयाची आवड असल्याने मिलिंद शिंदे यांनी नाटकाच्या माध्यमातून चित्रपट दुनियामध्ये पदार्पण केले. कसदार अभिनयातून त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत ठसा उमटवीला. ‘झुलवा’ ती फुलराणी, कथा अरुणांची, यासारख्या गाजलेल्या नाटकापासून ते “नटरंग, पारध, नॉट ओन्ली मिसेस राऊत, या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावली
त्यांच्या अभिनयाल प्रेक्षक मायबापांनी नेहमीच दाद दिली आहे. छोट्या पडद्यावरही ‘तू तिथे मी’ आणि ‘देव माणूस’ मालिका मधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय आहेत. अभिनेते विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील स्त्री भूमिका या विषयावर मिलिंद शिंदे यांनी
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात पीएचडीसाठी प्रबंध सादर केला. त्या बद्दल त्यांना नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पीएचडी पदवी मोठ्या शानदार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आली. पीएचडी पदवी मिळाल्या बद्दल अभिनेते मिलिंद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …