06/09/25

कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री अंतरवाला जि.प.प्रा.शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट शिक्षक श्री दिगांबर आर्दड यांचा स्तूत्य उपक्रम.!

  • कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री अंतरवाला
    जि.प.प्रा.शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट

शिक्षक श्री दिगांबर आर्दड यांचा स्तूत्य उपक्रम.!

बीड दि.28 (प्रतिनिधी)- गेवराई शहरातील व तालुक्यातील श्रीपाद अंतर्वाला येथील मूळ रहिवासी असलेले शिक्षक श्री दिगांबर आर्दड सर यांनी आपले आजोबा कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून इतर विधीच्या होणाऱ्या व्यर्थ खर्चाला फाटा देऊन श्रीपाद आंतरवाला जिल्हा परिषद शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपये किंमतीच्या पुस्तकांचा संच भेट दिला. शाळेसाठी लागणारे शालेय पुस्तके भेट देऊन श्री दिगंबर आर्दड सर यांनी समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला. त्यांच्याप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरातील शाळांना आवश्यक शालेय साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी हातभार लावला पाहिजे असे आवाहन आध्यात्मिक रत्न श्री. विजय महाराज आर्दड यांनी गेवराई तालुक्यातील अंतरवाला जिल्हा परिषद शाळेत पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना केले. या वेळी व्यासपीठावर श्री. हरिभाऊ निवृत्ती आर्दड, सरपंच उमेश आर्दड,शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके सर, ज्ञानोबा बापू आर्दड, आसाराम भाऊ आर्दड,अंकुशराव आर्दड, तूळसिदास भाऊ आर्दड, वैजिनाथ आर्दड, देवीदास जिजा आर्दड, नारायण वाकळे,मदन भाऊ आर्दड, मधुकर आर्दड, महादेव आर्दड, बंधू राजाभाऊ आर्दड, शाळेचे मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.
या बाबतीत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथील मूळ रहिवासी असलेले आदर्श शिक्षक दिगांबर आर्दड सर यांच्या आजोबांचा नुकताच स्मृतीदिन होता.
आपले आजोबा कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व्यर्थ खर्च न करता श्री दिगंबर आर्दड सर यांनी शाळेला पुस्तके भेट देण्याचा मानस
त्यांच्या पत्नी सौ. मुक्ता आर्दड यांच्याकडे बोलून दाखवला. त्यांच्या पत्नी ह्याही शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शिवाय या नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांच्या पत्नी सौ. मुक्ता आर्दड मॅडम यांनी या स्तूत्य उपक्रमाला साथ दिली. त्यानुसार श्री दिगंबर आर्दड यांनी श्रीपाद अंतर्वाला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यावर थोर साधु, संत महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव पडावा त्यांना चांगले शिक्षण मिळावे. ते सर्व मुले प्रगल्भ विचारवंत व्हावीत या विचाराने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला पुरक असलेली थोर वैज्ञानिक, थोर महापुरुष, थोर विचारवंत, प्रेरणादायी महाराष्ट्रातील स्त्रियांच्या जीवन संघर्ष, यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा असे जवळपास पाच हजार रुपये किंमतीच्या पुस्तकांचा संच शाळेस भेट दिला. यावेळी गावातील आध्यात्मिक रत्न श्री. विजय महाराज आर्दड यांनी सखोल मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना म्हणाले की, या गावचे भूमिपुत्र आदर्श शिक्षक श्री दिगंबर
आर्दड यांच्या आजोबा फार पुण्यवान व्यक्तिमत्वाचे होते. त्यांचाच वारसा सध्या ते चालवत आहेत. आपल्या आजोबाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी इतर विधीला होणारा खर्च टाळून हा खर्च विद्यार्थ्यांसाठी सत्कार्मी लावला आहे. आज त्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपये किंमतीची पुस्तके भेट दिली आहेत. शाळेसाठी लागणारे शालेय पुस्तके भेट देऊन श्री दिगंबर आर्दड सर यांनी समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला. त्यांच्याप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरातील शाळांना आवश्यक ते शालेय साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी हातभार लावला पाहिजे असे आवाहन करत उपस्थिततांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी काही निवडक मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वतः श्री दिगंबर आर्दड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी श्री. हरिभाऊ निवृत्ती आर्दड, सरपंच उमेश आर्दड, ज्ञानोबा बापू आर्दड, आसाराम भाऊ आर्दड,अंकुशराव आर्दड, तूळसिदास भाऊ आर्दड, वैजिनाथ आर्दड, देवीदास जिजा आर्दड, नारायण वाकळे,मदन भाऊ आर्दड, मधुकर आर्दड, महादेव आर्दड, बंधू राजाभाऊ आर्दड, बालू तात्या आर्दड, परमेश्वर शितोळे, रघूनाथ शितोळे, बद्रीनाथ आर्दड, बप्पा आर्दड, जालिंदर वाकळे, माधव आर्दड, श्रीपाद आर्दड, अथर्व आर्दड यांच्यासह जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …