15/01/26

उद्याच्या बंजारा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा- प्रा.देविदास चव्हाण हैद्राबाद गॅझेटिअरमुळे बंजारा समाजाचा ST आरक्षणाचा मार्ग मोकळा!

बंजारा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा- प्रा.देविदास चव्हाण

हैद्राबाद गॅझेटिअरमुळे बंजारा समाजाचा ST आरक्षणाचा मार्ग मोकळा!

बीड दि.७(प्रतिनिधी)- बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची व लढ्याची दिशा ठरविण्यासाठी उद्या सोमवार दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी बीड शहरातील पांगरी रोड परिसरातील सौभाग्य मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता
जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातील बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.देविदास चव्हाण यांनी केले आहे
सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाज आपापल्या आरक्षणाची लढाई लढत आहे. परंतु आपला बंजारा समाज मात्र आरक्षणाच्या बाबतीत गप्पगार अगदी अजगरासारखा सुस्तावलेला दिसतोय. बंजारा समाज एसटी आरक्षणाचा मूळ हक्कदार असताना देखील इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने आपल्याला आतापर्यंत एसटी आरक्षणापासून अलिप्त ठेवले आहे. ही आपल्यासाठी फार मोठी खेदाची व चिंतेची बाब आहे. मागिल काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने जो हैदराबाद गॅजेटियर लागू केला आहे. त्यात बंजारा समाज एसटी प्रवर्गात असल्याची स्पष्ट नोंद दिसून येत आहेत. या स्पष्ट व जिवंत नोंदीनुसार बंजारा समाजाला कायदेशीर एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले पाहिजे या रास्त मागणीसाठी व योग्य लढ्याची दिशा ठरविण्यासाठी उद्या सोमवार दि. 08 रोजी बीड शहरातील पांगरी रोड परिसरातील सौभाग्य मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी जिल्हाभरातून बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.देविदास चव्हाण यांनी केले आहे.

Check Also

कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त

कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त बीड दि.१२(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुक्कडगाव येथील सिंदपणा …