15/01/26

बीड येथील विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड येथील विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड दि.२७(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे विद्यमाने बीड येथे जिल्यातील नागरी सहकारी बँका, पतसंस्था संचालक, कर्मचारी यांच्या करीता विशेष वसूली अधिकारी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. बबनराव आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवशीय प्रशिक्षणात जिल्हा उपनिबंधक एस एम. तोटावर, सहाय्यक निबंधक अशोक कदम, आर. एस. बोडखे वसुली अधिकारी अकोला, एन. एन. कुलकर्णी वसुली अधिकारी सोलापूर, आदेश Nahar सी. ए . बीड, प्राचार्य डॉ.Manmant हेरकर, सी. ए . खोडसे प्रमाणित लेखा परीक्षक बीड, सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर चे उपप्राचार्य एस. आर. कोळे यांनी मा . सहकार आयुक्त यांनी दिलेल्या अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन केले.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा सहकारी बोर्डाच्या संचालिका प्रा. सुशिलाताई मोरळे मॅडम या होत्या. प्रमुख पाहुणे वैभव स्वामी हे उपस्थित यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचलन, आभार प्रदर्शन वर्ग संयोजक एस. आर . कोळे उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार्य केले.

Check Also

कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त

कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त बीड दि.१२(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुक्कडगाव येथील सिंदपणा …