06/09/25

युवक काँग्रेसच्या राज्य समन्वयकपदी आकाश मस्के यांची निवड

युवक काँग्रेसच्या राज्य
समन्वयकपदी आकाश मस्के यांची निवड

मुंबई दि.५(प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या *”राज्य-समन्वयक”* पदी पालवण येथील आकाश मस्के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आकाश मस्के पाटील हे सदर चार वर्षांपासून युवक काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत त्यांनी युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकी मधुन जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव म्हणून ते निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुणे , मुंबई , राज्यभर झालेल्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता तसेच सदरील आंदोलनासाठी त्यांच्यावरती मुंबई येथे त्यांच्या वरती केसेस देखील दाखल करण्यात आलेल्या होत्या. नुकत्याच झालेल्या न्याय जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते. सक्रीय विद्यार्थी चळवळीतुन घडत गेलेला हा कार्यकर्ता स्वतः च्या मेहनती वर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या राज्य समन्वयक या पदापर्यंन्त मजल मारण्यात यशस्वी ठरला आहे. विद्यार्थी व युवकांच्या अडचणींच्या काळात विविध प्रकारची आंदोलने करुन राज्य सरकार च लक्ष वेधन्यास ते यशस्वी ठरले आहेत आताही तेवढ्याच तत्परतेने युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे तसेच युवक काँग्रेस राज्यभर वाढविण्यासाठी पुर्ण ताकदीने प्रयत्न करू, या निवडी मुळे बीड तालुक्यातही युवक काँग्रेस ला ताकद मिळणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांनी काँग्रेसचे देशाचे निडर नेते आदरणीय राहुल जी गांधी तसेच युवक काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बी व्ही श्रीनिवास जी, काँग्रेसच्या राष्ट्रीयनेत्या रजनीताई पाटील,राष्ट्रीय प्रभारी क्रष्णा अल्लावरुजी, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी माननीय उदय भानुजी तसेच प्रभारी एहसान भाई खान तसेच सहप्रभारी रोहितजी कुमार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय कुणालजी राऊत माननीय प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे माननीय प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले प्रदेश उपाध्यक्ष मोहन दादा जोशी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल जी सोनवणे ऋत्विक धनवट यांचे आभार मानले आहेत.
या त्यांच्या महाराष्ट्र युवक काँग्रेस च्या राज्य समन्वयक पदी झालेल्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …