15/01/26

दोन मोटारसायकल चोरांना घेतले ताब्यात

दोन मोटारसायकल चोरांना घेतले ताब्यात

परभणी,दि.08 (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल पळविणार्‍या दोन चोरट्यांना पुर्णा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
या बाबत अधिक माहिती अशी की पूर्णा शहरातील रेल्वे ब्रिज जवळ मुस्तफा शाह अन्वर (वय19) या मिस्त्री काम करणार्‍या युवकास चाकूचा धाक दाखवून मोबाईल व दुचाकीसह चोरट्यांनी पोबारा केला होता. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे, उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे यांच्या पथकाने या प्रकरणात शोध घेवून संशयित आरोपी वैभव जगन्नाथ नारायणकर व प्रथमेश अनिल फड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेली मोटारसायकल, मोबाईल, हत्यार, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा ऐवज जप्त केला.

Check Also

कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त

कुक्कडगाव येथील सिंदपणा नदीपात्रातील बंधारा पुन्हा फुटला; शेतकरी चिंताग्रस्त बीड दि.१२(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुक्कडगाव येथील सिंदपणा …