सौ.ज्योती वैजवाडे यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर दि.10 (प्रतिनिधी) – येथील बजाज हाॅस्पिटल मधील असि. मॅनेजर धनंजय वैजवाडे यांची पत्नी व गुलाब भावसार यांची कन्या सौ ज्योती वैजवाडे हिचे आज पहाटे दिर्घ आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ४८ वर्ष होते.
दैनिक युवा सोबतीत त्या आॅपरेटर म्हणुन कार्यरत होत्या. छत्रपती संभाजीनगर येथील प्रतापनगर स्मशानभुमित त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी बजाज हाॅस्पिटल मधील कर्मचारी, महायोग परिवारातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दोन मिनीटे स्तब्धता पाळून भावपुर्ण श्रदांजली अर्पण करण्यात आली.
वैजवाडे ,भावसार परिवाराचे दुःखांत सा.संघर्ष यात्रा परिवार सहभागी आहे.