06/09/25

उद्या बीडमध्ये बजरंग सोनवणेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा! मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांकडून आवाहन

उद्या बीडमध्ये बजरंग सोनवणेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा!

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांकडून आवाहन

बीड दि.१० (प्रतिनिधी):- इंडिया आघाडीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले बजरंग सोनवणेंसाठी शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे.
बीड लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून आहे. येत्या सोमवारी म्हणजेच १३ मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. या अनुषंगाने बीड लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांच्यासाठी शनिवारी (दि.११) रोजी शरद पवार यांची बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड) येथे दुपारी ३ वा. जाहीर सभा होणार आहे. या सभेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे आहे. सध्या सभेचे नियोजन सुरू आहे. स्वत: आ.संदीप क्षीरसागर नियोजनाची सुत्र सांभाळून आहेत. दरम्यान या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

*पत्रकार, महिलांसाठी असणार विशेष व्यवस्था*

या सभेसाठी उपस्थित असणाऱ्या पत्रकार बांधव व महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था असणार आहे. तसेच उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने थंड पाणी आणि पंख्याची व्यवस्थाही यावेळी करण्यात आली आहे.

 

*अशी असेल‌ पार्किंग व्यवस्था*

नगर रोडच्या बाजुने येणारी वाहने- पाठक मंगल कार्यालय, नगर रोड, बीड

गेवराई कडून येणारी वाहने- महालक्ष्मी चौक, बायपास, बीड

बार्शी रोडच्या बाजुने येणारी वाहने – लॉ-कॉलेज, बार्शी रोड, बीड

तेलगाव रोडच्या बाजुने येणारी वाहने- व्हीआयपी लॉन्स, तेलगाव रोड, बीड

खंडेश्वरी मंदीराकडून येणारी वाहने- खंडेश्वरी मंदीरासमोरील क्रीडांगण

यासोबतच सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, माने कॉम्प्लेक्स, आयटीआय ग्राउंड, सिव्हिल हॉस्पिटलची मागील बाजू आणि जिल्हापरिषद आवार याठिकाणी त्या-त्या बाजुने येणार्‍या वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था केली आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …