बीड जिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह संपन्न.
पथनाट्यद्वारे बसस्टॅन्ड, दवाखाना, शाळा, हॉटेल, शासकीय सर्व कार्यालयातील हिरकणी कक्षाची विद्यार्थ्यांनी दिली माहिती.
. बीड दि.७ (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालय शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने आज 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान स्तनपान सप्ताह आयोजन करण्यात आले होते. शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पोस्टर आणि पथनाट्याच्या द्वारे स्तनपानाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे. आणि डॉ. हनुमंत पारखे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन मुख्याधिसेविका रमा गिरी यांची उपस्थिती होती. या स्तनपान सप्ताहाचे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा बेद्रे व त्यांच्या सर्व प्राध्यापक वर्ग यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. तर प्रत्येक विद्यार्थिनी पोस्टरच्या माध्यमातून स्तनपानाचे महत्त्व पटवून देत हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वी केला. एकापेक्षा एक सुंदर असे पोस्टर पाहण्यासाठी रुग्ण नातेवाईक यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. दोन पथनाट्याच्या द्वारे जनजागृती करत या विद्यार्थ्यांनी उपस्थित असणाऱ्या महिलांची मने जिंकली आणि बाळाला आणि आईला स्तनपान केल्याने काय फायदा होतो याचाही महत्व पटवून दिले. यावेळी नर्सिंग कॉलेजच्या सर्व प्राध्यापकासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.