06/09/25

कवी गणेश आघाव यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट*

*कवी गणेश आघाव यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट*

जळगाव दि.७(प्रतिनिधी)-
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख तथा सुप्रसिद्ध कवी गणेश आघाव सर यांनी नुकतेच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या निवासस्थानी मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी उज्जैनकर सर यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख निवड पत्र देऊन त्यांचा गौरव केला याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी सर उपस्थित होते. श्री गणेश आघाव सर यांची खामगाव येथील संमेलनात उपस्थिती होती ते पुणे येथे नगरपालिका शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या कविता खूप गाजलेल्या आहेत त्यांचा आवाजही सुरेख आहे पोरी निघाल्या शाळेला ही त्यांची कविता सोळा भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे बालभारती किशोर मासिकात सुद्धा त्यांची कविता प्रकाशित झालेली आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तसेच महाराष्ट्रातील नामवंत अशा 250 संस्थांनी पुरस्कृत केलेले आहे कणसांच्या कविता, मातीला फुटले हात, आघाववाडीची गीत त्यांचा बारमाही काव्यसंग्रह प्रकाशित असून ते बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे येथे पुरक वाचन समिती सदस्य आहेत. श्री गणेश आघाव हे उत्कृष्ट कवी, उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट सुत्रसंचालक, उत्कृष्ट प्रवचनकार, प्रबोधनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत त्यांना नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी ता. मुक्ताईनगर या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी आमंत्रित केले होते त्या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट त्यांच्या कविता त्यांच्या आवाजा मध्ये गाऊन आनंद दिला होता. सावळी खुर्द ता. औंध नागनाथ येथील मूळ रहिवासी आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …