06/09/25

सिमा ओस्तवाल यांच्या पुढाकारातून कोळगाव जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

सिमा ओस्तवाल यांच्या पुढाकारातून कोळगाव जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

बीड दि.९(प्रतिनिधी)-
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हा स्तुत्य उपक्रम दि.०८ ऑगस्ट रोजी राबवण्यात आला.यावेळी बोलताना सांगितले की, सामाजिक क्षेत्रात काम करताना विशेष म्हणजे ग्रामीण भागात महिलांना अनेक अडचणींवर मात करून काम करावे लागते असे आयोजक सौ.सिमा ओस्तवाल यांनी मनोगत व्यक्त केले.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेतील १८५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी चार रजिस्टर पेन खोट रबर शॉप नर आदी शैक्षणिक साहित्य दिनांक ०८ ऑगस्ट २०२४रोजी वाटप करण्यात आले हा स्तुत्य उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता सौ. सीमा ओस्तवाल यांनी विशेष प्रयत्न केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आज शिक्षण घेणे काळाची गरज आहे. शिक्षणामुळे उच्च पदापर्यंत जावू शकता. यासाठी शिक्षणाला महत्त्व द्यावे. गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीने मागील सात ते आठ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मुलींना रोजगाराभिमुख करिअर शिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शन करणे, परिक्षा नियोजन, शिक्षणासाठी करिअर, गोरगरीब गरजूंना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केले जाते याचबरोबर सिरसमार्ग कोळगाव परिसरात शालेय विद्यार्थ्यांना मदत केली जाईल असे आश्वासन सिमाताई यांनी सांगितले.
यावेळी सरपंच सौ.अनिता कदम, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शरद बारहाते, जेष्ठ नागरिक मदनराव घाडगे, लक्ष्मण हिंदोळे, राजेंद्र कदम, राहुल लोंढे, बाळासाहेब घाडगे, कुंडलिक येडे, किशोर पारख, सुरेश जाधव, रुद्रा येडे, संतराम जोगदंड, ताराचंद करांडे, गोविंद रासकर, विष्णूपंत जगदाळे, अर्जुन जाधव,अक्षय हजारे, किरण जाधव, नानासाहेब ढवाण, तात्यासाहेब तळेकर, जि प शाळेचे शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख शेळके सर, मुख्याध्यापक गायकवाड सर, सोनवणे सर, जोगदंड सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …