*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा जाहीर प्रवेश!*
*प्रवेश सोहळ्यासाठी चारशे गाड्यांचा ताफा मुंबईकडे होणार रवाना- जगताप, मुळूक*
===============
बीड दि.११(प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन तथा महाराष्ट्रा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि संसदरत्न खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृवाखाली सुरु असलेल्या शिवसनेच्या दमदार अशा कार्यपद्धतीस प्रभावित होऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेतील महिला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड संगीता चव्हाण व सर्व महिला पदाधिकारी, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड रवीराज बडे, गजानन कदम आणि त्यांच्या सर्व समर्थक कार्यकर्त्यांचा आज दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री 8.00 वाजता नंदनवन निवास्थान मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन भैय्या मुळूक यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश होणार आहे. या प्रवेश सोहळ्याकरिता बीड जिल्ह्यामधून चारशे गाड्यांचा ताफा मुंबई येथे दि.12 रोजी सकाळी 7.00 वाजता रवाना होणार असून तब्बल 2000 महिला आणि युवकांचा शिवसेनेत जाहीर होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन मुळूक यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
—–
*मुख्यमंत्री शिंदे साहेबांची कार्यपद्धती आम्हा तरुणांना आकर्षित करणारी- कदम, बडे*
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते यांच्या वतीने सामान्य माणसांसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण योजना, शिंदे साहेबांची निर्णयक्षमता तसेच त्यांची कार्यपद्धती आणि पक्ष बांधणीची कसब आम्हा तरुणांना आकर्षित करणारी ठरली आहे. याबरोबरच त्यांच्या माध्यमातून आम्हा तरुणांच्या समस्या सुटतील या अपेक्षेने आम्ही बीड जिल्ह्यातील हजारो तरुण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन भैय्या मुळूक यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहोत असे मत गजानन कदम आणि अॅड रविराज बडे यांनी व्यक्त केले.
—–
*बीडमधून आज हजारो महिला भगिनी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करणार – अॅड. संगीता चव्हाण*
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या कार्यकाळात महिलाच्या हितासाठी त्यांच्या सशक्तीकरणासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत तसेच मोठंमोठी निर्णय घेतली आहे. शिंदे साहेब यांच्यात सामान्य गोरगरीब महिलांसाठी कायम आदरभाव दिसून येतो आहे. त्यांची पक्ष चालवण्याची कार्यपद्धती पूर्णतः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखीच आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत यामुळे बीड जिल्ह्यातून आम्ही हजारो महिला आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन भैय्या मुळूक यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहोत असे मत अॅड. संगीता चव्हाण यांनी व्यक्त केले.
°°°°°