06/09/25

जामीन नामंजूर – ॲड. तेजस नेहरकर

 आरोपीचा जामीन नामंजूर – ॲड. तेजस नेहरकर

बीड दि.११ (प्रतिनिधी)-

घटनेची हकीकत अशी की, एका पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. त्या प्रकरणी तिच्या जवाबा वरून आरोपी नामे संतोष चिमाजी शिंदे रा. बीड सांगवी ता. आष्टी व एक महिला आरोपी यांच्या विरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन तालुका आष्टी जिल्हा बीड येथे क्राईम नंबर 103/2024 नुसार कलम 363, 376, 376 2 (F) (I) (N) 376 (3) आयपीसी आणि 4, 6, 17 प्रोटेक्शन चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स 2012 अन्वये दिनांक 13/03/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपीच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले, त्यानंतर आरोपीने जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर मा. न्यायालयात सुनावणी झाली सुनावणी दरम्यान ॲड. तेजस नेहरकर यांनी फिर्यादीच्या वतीने मांडलेली भक्कम बाजू व आरोपी विरुद्धचे पुरावे मा. न्यायालयासमोर निदर्शनास आनून दिले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीविरुद्धचा पुरावा पाहून आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे, फिर्यादीच्या वतीने ॲड. तेजस नेहरकर यांनी काम पाहिले व पीडितेला न्याय मिळवून दिला.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …