06/09/25

ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेविदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे वर्षाताई जगदाळे यांची मागणी

ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेविदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे वर्षाताई जगदाळे यांची मागणी

बीड दि.११( प्रतिनिधी )- ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. मनसेने वेळोवेळी या विरोधात आंदोलन केलेली आहे. बीड येथे संघर्ष यात्रा निमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे आले असता त्यांच्यासोबत ज्ञानराधा मल्टीस्टेट संदर्भात चर्चा करत ठेविदारांची अडकलेली ठेवी परत मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करत प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात मनसेच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा जिल्ह्याला आर्थिक संकटात टाकणारा ठरला. मागील आठ महिन्यापासून हक्काच्या ठेवीसाठी ठेवीदार दारोदार फिरत आहेत. ज्ञानराधाचे प्रमुख सध्या जेलची हवा खात आहे .त्यांच्यावर जिल्हाभरात अनेक गुन्हा दाखल झालेले आहेत परंतु ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी कधी परत मिळणार याची निश्चिती सांगता येत नाही. इडी कडून ज्ञानराधाच्या सर्व संपत्तीवर टाच आणला जात आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी थेट संवाद साधत बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणात लक्ष घालून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चर्चा करावी यासाठी मनसेच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी राज ठाकरे यांच्याशी ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रश्नावर व्यापक चर्चा करत सत्य परिस्थिती समोर मांडली. ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात जागरण गोंधळ, आंदोलन तथा मोर्चे उपोषण मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे सामान्य ठेविदारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव रस्त्यावर उतरत असल्याने ठेवीदारांना राज ठाकरे व मनसे कडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …