06/09/25

मराठ्यांच्या वाघाला साथ देणारा शिलेदार प्रदीप दादा सोळुंके प्रदीप दादांच्या हिरक महोत्सवाला स्वातंत्र्य दिनी लाभणार जरांगे पाटलांची उपस्थिती

मराठ्यांच्या वाघाला साथ देणारा शिलेदार प्रदीप दादा सोळुंके

प्रदीप दादांच्या हिरक महोत्सवाला स्वातंत्र्य दिनी लाभणार जरांगे पाटलांची उपस्थिती

वडवणी अशोक निपटे

साडेतीनशे वर्षांपूर्वी कोणत्याही सुविधा नसताना कोणतेही पाठबळ नसताना वाहतुकीचे साधने अपुरे आणि मोजकेच मावळे सोबत असतानाही सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात रानोमाळ फिरुन स्वराज्याची निर्मिती करण्याचे स्वप्न छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या पाठबळावर शक्य करून दाखवले.जे अशक्य आहे ते शक्य करण्याची ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्येच पाहायला मिळाली आणि तीच ताकद घेऊन आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना त्यांच्या हक्काची भाकर मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वतःच्या जीवाची बाजी लावून अहोरात्र मेहनत घेत आहे. या मराठा योद्धाला साथ देण्यासाठी अनेक मावळे आज अहोरात्र मेहनत घेत आहेत. या मावळ्यांमध्ये सर्वात अग्रगण्य नाव म्हणजे ज्येष्ठ व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आपल्या कर्तृत्वाने मागील ३५ वर्षापासून ज्यांनी नावलौकिक केलं ते ख्यातनाम लेखक, कवी, वक्ते, कीर्तनकार आणि निष्ठावंत वारकरी… मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचे निष्ठावंत सहकारी प्रदीप दादा सोळुंके यांचा आज स्वातंत्र्यदिनी हिराक महोत्सवी वाढदिवस आहे. या वाढदिवसाला मराठ्यांचं दैवत मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपस्थित राहणार आहेत. आपल्या लाडक्या ज्येष्ठ सहकाऱ्याचे कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी मनोज दादा आज स्वातंत्र्य दिनी माजलगावात येणार असून याप्रसंगी लाखो मराठा मावळेही उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा डोळे दिपवणारा होणार असल्याने प्रदीप दादा सोळंके यांच्या जीवनातील सर्वात आनंदमय क्षण असणार आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्यांची न्याय्य मागणी घेऊन मागील अनेक वर्षापासून संघर्ष करत आहेत. तसे पाहता मनोज जरांगे पाटील यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि नाजूक आहे. कोणतेही आंदोलन उभं करायचं म्हटलं तर पैसा पाणी, मनुष्यबळ आणि संघटन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याकडे कोणतीही आर्थिक परिस्थिती नाही. कोणत्याही सुविधा नाहीत. साधी स्वतःच्या मालकीची मोटरसायकल देखील नाही. एवढी हालाखीची परिस्थिती स्वतःची दुसऱ्यांचे दुःख दुर करण्यासाठी ते रस्त्यावर पडले. महाराष्ट्रातील सर्वात दुर्लक्षित समाज म्हणून पाहिला जाणारा मराठा समाज… या समाजाला न्याय मिळवून देण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळकलं. कोट्यावधी लोकांचे ५८ मोर्चे महाराष्ट्रात निघूनही या मोर्चांना सही सलामत बगल देऊन सरकार सत्ता भोगत आहे. मराठ्यांच्या डोळ्यात धुळ फेकून सत्ता हस्तगत करणारं हे सरकार जरांगे पाटलांनी सुरवातीच्या काळात आंदोलन सुरू केल्यानंतर पाटलांच्या मूठभर लोकांना किंमत देत नव्हतं. जरांगे पाटील म्हणजे एका खेड्यातील चिल्लर माणूस आणि याला इथेच पायदळी तुडवुन टाकण्याचे सरकारने मनसुबे रचले होते. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु साडेतीनशे वर्षांपूर्वी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शाहिस्तेखान, अफजलखानाच्या लाखोच्या फौजेला चारी मुंड्या चित करणारे छत्रपती शिवराय आणि त्यांच्याच आदर्शावर चालणारा मनोज जरांगे पाटील नावाचा मावळा शासनाच्या असल्या भ्याड हल्ल्याला भिक थोडीच घालीत असतो. त्यांनी आंदोलन उभे केले आणि शासनाच्या मुंडीवर पाय देऊन राज्यातील समस्त मराठा समाज एका जागेवर आणला. समाजाशी गद्दारी करायची नाही ही प्रतिज्ञा घेऊन रणांगणात उतरलेल्या जरांगे पाटलांच्या निष्ठेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील समस्त मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहिला. जरांगे पाटलांनी समाजासाठी कधीही चुकीची तडजोड केली नाही. म्हणून समाजाने जरांगे पाटलाला आपल्या हृदयात जागा दिली. जरांगे पाटलांच्या या महा लढ्यामध्ये खंबीर साथ देणारे मावळेही त्याच ताकदीचे आहेत. जरांगे पाटलाच्या प्रत्येक लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे मावळे रात्र दिवस मेहनत घेत आहेत. प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होऊन जरांगे पाटलाचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्यासाठी अहोरात्र झिजण्याची ताकद असणारे जरांगे पाटलाचे अनेक सहकारी आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्रदीप दादा सोळंके हे होत. प्रदीप दादा सोळंके हे ज्येष्ठ सहकारी आहेत. मनोज दादा जरांगे पाटील हे त्यांना आदरानं दादा म्हणून हाक मारतात. आज प्रदीप दादा सोळंके यांचा साठावा वाढदिवस म्हणजे हीरक महोत्सवी वाढदिवस आहे. हा सामाजिक उपक्रमाने झाला पाहिजे म्हणून जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माजलगावात ग्रंथ तुला होऊन जरांगे पाटील प्रदीप दादांचं अभिनंदन आणि सत्कार करणार आहे. प्रदीप दादा सोळंके हे राज्यातील मागील ३५-४० वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी विविध संघटनेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम केलं आहे. आतापर्यंत त्यांचे हजारो व्याख्याने प्रवचने कीर्तने झाले आहेत. त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापकाची नोकरी ३५ वर्षे करीतच त्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी घडविण्याचे काम करत समाजात जनजागृतीचे काम केलं. विविध पक्ष संघटनेतील नेतेमंडळी सोबत त्यांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध आहेत परंतु कोणत्याही पक्षासाठी आपली स्वतःची विचारधारा सोडून ते कधीही वागले नाहीत. समाज हित हीच मोठी विचारधारा त्यांनी जोपासली आणि आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवलं. प्रदीप दादा सोळंके यांचं नाव केवळ महाराष्ट्रापुरतच मर्यादित राहिले नाही. तर देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांची व्याख्याने झाली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने गौरविण्यात आला आहे. अनेक नामवंत लेखक कवींनी त्यांचा गौरव केला आहे. राज्य आणि राज्यातील मोठमोठ्या राजकीय सामाजिक न्यायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचा गौरव झाला आहे. म्हणून प्रदीप दादा सोळंके हे समाजातील हिरा म्हणून सर्वपरिचित आहेत. या हिऱ्याचा आज स्वातंत्र्य दिनी साठावा वाढदिवस आहे. एवढ वय झालं तरी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामध्ये प्रदीप दादा सोळंके यांनी ऊन पाऊस वारा याची तमा न बळकता रात्रंदिवस मेहनत घेतली. ज्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांची सभा आहे त्या सभेच्या अगोदर तीन चार तासांनी जाऊन प्रदीप दादांनी त्या ठिकाणचे नियोजन बघणं, त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करणं आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले. एवढ महान कार्य केलं कधीही लहान मोठा असा भेदभाव न करता सर्व मित्र परिवाराला त्यांनी आपल्या लहान भावाची वागणूक दिली. आम्ही देखील मनोज दादा जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत होतो. आमच्यासारख्या सामान्य लोकांनाही अगदी मिळून मिसळून आनंदात सोबत राहून हा लढा कसा पुढे जाईल… मनोज दादा यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी आपल्यासारख्या मावळ्यांनी मेहनत घेतली पाहिजे असं मार्गदर्शन ते सर्व सहकाऱ्यांना करत असतात. मनोज दादा जरांगे पाटलांनी आपला जीव पणाला लावला आहे. आपण त्यांच्यासाठी किमान वेळ तरी दिली पाहिजे अशी प्रांजळ भावना प्रदीप दादा हे भाषणातुन व्यक्त करत असतात. आज हे मराठा आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नाही तर देशभरात पोहोचलं आहे. घराघरात मनोज दादा जरांगे पाटलांचे विचार आणि त्यांचे कर्तृत्व हे माहिती झाल आहे. जोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील एकही मराठा जरांगे पाटील यांच्या आदेशा शिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. मग तो निवडणुकीतील निर्णय असेल अथवा सामाजिक निर्णय असेल. प्रत्येक निर्णयामध्ये जरांगे पाटील यांची भूमिका ही समाजासमोर आदर्श ठरणार आहे. जरांगे पाटलाच्या पावलावर पाऊल टाकीत त्यांचं काम घराघरापर्यंत पोहोचण्याच काम प्रदीप दादा सोळंके यांनी केल आहे. आज प्रदीप दादा सोळंके यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस समस्त बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील मराठा कार्यकर्त्यासाठी आनंदाची पर्वणी आहे. प्रदीप दादा सोळंके यांनी आपले आयुष्य समाजासाठी दिलेलं आहे. आणि आता जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उर्वरित आयुष्य सुद्धा समाजासाठीच त्यांनी दान केले आहे. जोपर्यंत जरांगे पाटील आंदोलन करतील तोपर्यंत मी जरांगे पाटला सोबत रात्रंदिवस सोबत आहे. मध्यंतरी त्यांची तब्येत अत्यंत ढासळली होती. त्यांना मध्यरात्रीच छत्रपती संभाजी नगर मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होत. चार दिवसाच्या अथक परिश्रमानंतर डॉक्टरांना त्यांना दुरुस्त करण्यात यश आलं. मात्र दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर त्यांनी तत्काळ जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये पुन्हा सक्रिय सहभाग घेतला. असा धडाडीचा ज्येष्ठ मावळा जरांगे पाटलांसोबत असल्याचा आनंद समस्त मराठा समाजाला आहे. मनोज दादाचा हा लाडका ज्येष्ठ शिलेदार मराठ्यांच्या गळ्यातील ताईत आहे. या प्रदीप दादांना उदंड आयुष्य लाभो आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये त्यांचे योगदान असच राहावं अशा पद्धतीच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना यावेळी व्यक्त करतो

चौकट१

माजलगावचा हिरा…

प्रदीप दादा सोळंके यांचे रहिवासी गाव माजलगाव तालुक्यातील सादोळा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रदीप दादा सोळंके यांनी अत्यंत अडचणीचा सामना करीत शिक्षण पूर्ण केलं. ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा नसतानाही शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून दिलं. शिक्षक, मुख्याध्यापकाची नोकरी करत त्यांनी समाजसेवा केली आणि माजलगावच नावलौकिक केलं. संपूर्ण देशभरात त्यांचे व्याख्याने कथा कविता आणि कीर्तने झाल्यामुळे माजलगावचा हा हिरा संपूर्ण देशात झळाळलेला आहे. आणि आता मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राहून माजलगावच नावलौकिक केलं आहे. नक्कीच दादांचा अभिमान समस्त माजलगावकरांना आहे.

चौकट२…..

मनोज जरांगे पाटील येईपर्यंत सभेचं मॅनेजमेंट….

मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रात दौरा सुरू झाला की विविध ठिकाणी मोठमोठ्या सभा होत असत या सभेला लाखोच्या संख्येने गर्दी होत होती त्यामध्ये महिला शालेय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांचा समावेशही होता पावसाचे दिवस आणि सभेला झालेली गर्दी यामुळे सभा नियोजन करणारे लोकांची चांगलीच घालमेल होत असे आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांना येण्यासाठी आठ आठ तास उशीर होऊ लागला.. वाटेमध्ये जागोजागी जरांगे पाटलांच्या स्वागताला गर्दी होऊ लागल्याने सभेला उशीर होऊ लागला त्यामुळे सभेत आलेल्या लाखो लोकांना कसं मॅनेज करायचं याची पंचायत होऊ लागली. मात्र ही पंचायत दूर करण्याचे काम जरांगे पाटलाचे विश्वासू शिलेदार प्रदीप दादा सोळंके यांनी सिताफिने पार पाडली. जरांगे पाटील येईपर्यंत त्यांनी समस्त समाजाला आपल्या वक्तृत्व शैलीने शांत राहण्याचे आवाहन केलं. अरविंद घोगरे पाटील यांचा पोवाडा आणि प्रदीप दादा यांचं अगोदरच भाषण यामुळे समस्त समाज जरांगे पाटील यांना कितीही उशीर झाला तरी शांतपणे सभास्थळी बसून राहायचा. आणि सभा थाटात पार पाडायची. या कामात बीड येथील एडवोकेट राज पाटील यांनीही त्यांच्या सोबत खंबीर साथ दिली.

चौकट ३

या बैठकीला उपस्थिती…
बीड संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गवर पैठण फाटा या ठिकाणी दि. ०३ जुन २०२३ रोजी मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य तथा लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरु सर्जेराव निमसे सर यांच्या उपस्थितीत हैदराबाद गॅझेट आणि कुणबी मराठा या विषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी कुणबी मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीला प्रदीप दादा सोळुंके, शिवाजी राजे जाधव, अँड राज पाटील, मनीषा मराठे, आप्पासाहेब पिंगळे, श्री मुकणे, पत्रकार अशोक निपटे आदी मराठा सहकारी उपस्थित होते.

चौकट ४

प्रदीप दादा सोळंके यांचे कामकाज

• पाच हजार पेक्षा अधिक व्याख्याने
• १२ पुस्तके प्रसिध्द
• अनेक पुरस्काराने सन्मानित
• थायलंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा पुरस्कार सुप्रीम कोर्टचे सरन्यायधीश मा. श्री. के.जी. बाळकृष्ण साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.
• अलिबाग येथे ‘मराठा भुषण पुरस्काराने सन्मानित
• वाडी तांड्यापासुन लखनौ, विजापुर पर्यंत आणि सर्व शासकीय कार्यालयात व्याख्याने एअरपोर्ट, सैन्य छावणी, GST भवन मुंबई, विद्यापीठे, महानगरपालिका, सिडको, जि.प्र. बँका, BSN, LIC इ. कार्यालय.
• न्यायालयात व्याख्याने :
• सोलापुर, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय, मोटार अपघात न्यायालय, मुंबई येथे व्याख्याने झालेली आहेत.
• विदेशात व्याख्याने : दुबई, थायलंड
महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ म्हणुन प्रसिध्द
• याच बरोबर
लेखक, संघटक, प्रवक्ता, संपादक, शिक्षक, प्राचार्य, नाट्यअभिनेता, सिनेअभिनेता, राजकीय नेता, प्रशिक्षण, खेळाडु, हार्मोनियम वादक, मार्गदर्शन, अनेक संघटना संस्थापक, समाज प्रबोधनकार आणि आता किर्तनकार म्हणुन प्रसिध्द, अनेक शाळा, कॉलेज, विद्यापीठात व्याख्याने, अनेक शिक्षक मेळाव्यात प्रबोधन, अनेक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोह्यात’ प्रमुख पाहुणा. ३३ वर्षे शिक्षक, मुख्याध्यापक पदावर कार्य आणि आता मराठ्यांचे दैवत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या महाआंदोलनामध्ये अहोरात्र मेहनत.

चौकट ५
प्रदीप दादा सारखा पाठीराखा मिळणे आमचं भाग्य..

प्रदीप दादा सोळंके हे अत्यंत उच्च दर्जाचं व्यक्तिमत्त्व आहे. मागील ३५- ४० वर्षात त्यांनी समाजसेवेचे व्रत जोपासून अखंड सेवा केली आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या या लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून देत मिळेल ते काम केलं आहे. त्यांना स्वतःचा कधीही गर्व अभिमान नाही. जरांगे पाटलाच्या टीम मध्ये सर्व सहकाऱ्यांना पाठबळ देऊन जरांगे पाटलांच स्वप्न साकार करण्यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे असं ते नेहमी मार्गदर्शन करत होते. त्यामुळेच सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या जिद्दीने काम केलं आणि जरांगे पाटलाचे स्वप्न साकार झाल्याशिवाय कोणीही माघार घेणार नाही. प्रदीप दादा हे आमचे पाठीराखे असल्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत.

ऍड. राज पाटील
अध्यक्ष लढा दुष्काळाशी फाऊंडेशन

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …