06/09/25
Oplus_131072

माजलगाव विधानसभा मतदारसंघाची प्रकाश सोळंके यांना पुन्हा संधी हा योग्य निर्णय सामाजिक कार्यकर्ते महादेव सांगळे यांचे मत धारूर तालुक्यातील चाटगाव येथे जल्लोष

माजलगाव विधानसभा मतदारसंघाची प्रकाश सोळंके यांना पुन्हा संधी हा योग्य निर्णय

सामाजिक कार्यकर्ते महादेव सांगळे यांचे मत

धारूर तालुक्यातील चाटगाव येथे जल्लोष

बीड दि.२३(प्रतिनिधी ): माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळाली, याचे धारूर तालुक्यातील चाटगाव येथे स्वागत कऱण्यात आले आहे.
विकासाभिमुख नेतृत्व आ. प्रकाश सोळंके यांना विकासाची जाण असून ते मतदारसंघाचा कायापालट करू शकतात, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महादेव नवनाथ सांगळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुंदररावजी सोळंके यांचे बीड जिल्हयाच्या विकासात मोठे योगदान आहे. सोळंके यांच्या दूरदृष्टीने मराठवाडा, बीड जिल्हा आणि माजलगाव मतदारसंघात अनेक प्रकल्प आणले. ग्रामीण भागातील सामान्य घटकांची जाणीव आमदार प्रकाश सोळंके यांना आहे. लोकांच्या हाकेला धावून जाणारा लोकप्रतिनिधी अशी ओळख सोळंके यांची आहे. जनता त्यांना यावेळीही मोठया मताधिक्याने विधान सभेत निवडून पाठवतील, असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते महादेव नवनाथ सांगळे, माजी सरपंच बालासाहेब माणिकराव केकाण, बळीराम संपतराव केकाण, बाळासाहेब मधुकर केकाण, माणिक यशवंतराव सांगळे, लक्ष्मण अण्णा केकाण आदींनी व्यक्त केला आहे. दरम्यान उमेदवारीची पुन्हा संधी मिळाल्याने चाटगाव परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …