06/09/25

ऐन दिवाळीत व्यावसायीक गॅस सिलिंडर महागला! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा

ऐन दिवाळीत व्यावसायीक
गॅस सिलिंडर महागला!

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा

मुंबई दि.१(प्रतिनिधी)-
ऐन दिवाळीच्या काळात म्हणजेच आज दि. 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्यामुळे 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर  महागले आहेत. त्याची
देशभरात नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस लिंडरर साधारण 62 रुपयांनी महागले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली असली तर तेल कंपन्यांनी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. तेल कंपन्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार भविष्यात विमानप्रवास महागण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरासोबतच विमानप्रवासात वापरल्या जाणाऱ्या ATF च्या किमतीतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा ताजा दर काय?

दिल्ली – 1802 रुपये

कोलकाता – 1911.50 रुपये

मुंबई – 1754.50 रुपये

चेन्नई – 1964.50 रुपये

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच 14 किलो गॅस सिलिंडरच्या दरात सध्यातरी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर

दिल्ली – 803 रुपये

कोलकाता – 829 रुपये

मुंबई – 802.50 रुपये

चेन्नई – 818.50 रुपये

विमानप्रवास महागण्याची शक्यता

ऐन दिवळीच्या काळात विमानातूप प्रवास करणाऱ्यांना चांगलाच फटका बसू शकतो. कारण तेल कंपन्यांनी विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबरपासून विमानाचे इंधन म्हणजेच ATF च्या किमतीत 3 हजार रुपये प्रति किलो या प्रमाणे वाढ केली आहे.

मेट्रो सिटीमधील ATF चा भाव

दिल्ली- 90,538.72 रुपये

कोलकाता- 93,392.79 रुपये

मुंबई- 84,642.91 रुपये

चेन्नई- 93,957.10 रुपये

_________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …