भाजपाच्या माजी आ. प्रा. संगीता ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
केज दि.७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. सौ. संगीताताई ठोंबरे यांनी आज खा.बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पक्षाचे बळ निश्चितपणे वाढेल असा विश्वास खा. सोनवणे यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. सौ. संगीताताई ठोंबरे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने त्या नाराज होत्या. मागिल काही दिवसांपासून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या. विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटी त्यांनी आपला अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवाराला जाहीर पाठींबा जाहीर केला. त्या नंतर आज खा. बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी ठोंबरे यांच्या सोबत भाजप युवानेते दीपक भैया शिंदे आणि चनई परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होत नवीन पर्वाची सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी विचारांचा झेंडा हाती घेऊन ते यापुढे चालणार असल्याचा निर्धार सर्वांनी केला.
यावेळी कार्यक्रमास अशोक दळवे, नगरसेवक दिलीप काळे, सरपंच काशीनाथ घुले (धावडी) आणि परिसरातील मान्यवर सरपंच उपस्थित होते.
_____________________________