बीड शहर पोलिसांची कारवाई
विनापरवाना डीजे वाजवला: ५२ हजार रुपयाचा दंड
बीड दि.8( प्रतिनिधी)- शहरातील सिद्धिविनायक मार्केट येथे एका टपरीच्या उद्घाटनासाठी विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी विराज नावाच्या डीजेचा मालक लक्ष्मणराव मोहन गाडे रा. सावंगी ता. परतुर, जि. जालना यास ५२ हजार रुपये दंड करण्यात आला. विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी डीजे जप्त करण्यात आला होता आणि दंडात्मक कारवाई झाल्यानंतर डीजे सोडून देण्यात आला.
सदरील कारवाई, श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विश्वांबर गोल्डे, बीड आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बाबा राठोड, गोवर्धन सोनवणे जमादार पोलीस नाईक जयसिंग वायकर, अश्फाक सय्यद व मनोज परजने यांनी केली.