पत्रकार चंद्रकांत साळुंके
यांचे अपघाती निधन
बीड दि.12(प्रतिनिधी)-
येथील सायं दैनिक बीड सरकारचे उपसंपादक तथा नागापूर येथील रहिवासी चंद्रकांत साळुंके निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ४४ वर्षे होते.
बीड येथील सायं दैनिक बीड सरकार येथे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत साळुुंके हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या गावाकडे मोटारसायकल वरून जात होते. यावेळी त्यांचा त्यांच्या मोटार सायकलला अपघात झाला. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी अवस्थेत बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर आज मंगळवार दि.१२ रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रकांत साळुंके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. चंद्रकांत साळुंके यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साळुंके परिवाराच्या दु:खात संघर्ष यात्रा परिवार सहभागी आहे.