06/09/25

विकासकामांच्या मुद्यावर आ. लक्ष्मण अण्णा पवार विधानसभेची निवडणूक जिंकणारच -प्रा. संदीप गांडगे 

विकासकामांच्या मुद्यावर आ. लक्ष्मण अण्णा पवार विधानसभेची निवडणूक जिंकणारच -प्रा. संदीप गांडगे 

बीड दि.१३(प्रतिनिधी):-
गेवराई मतदारसंघातील जनमत कायम आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या पाठीशी उभे आहे. हेच जनमत आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांना तिसऱ्यांदा गेवराई मतदारसंघाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी बहुमतांनी पाठवणार असल्याचे मत प्रा. गांडगे संदिप यांनी व्यक्त केले.
सध्या महाराष्ट्रात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूकची रणधुमाळी सुरू आहे. सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार चालू आहे. गेवराई मतदारसंघात देखील विधानसभा निवडणुकीचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या
मतदारसंघात निवडणूक ही विकास मुद्यावर होणार आहे. या मतदारसंघात विकासाची कामे ही फक्त आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या मुळेच झाली आहेत. आमदार लक्ष्मण अण्णा पवार हे २०१४ मध्ये निवडून आले. त्यानंतर त्यांनी गेवराई मतदारसंघाचा विकास कामे भरपूर केली. त्यामुळे पुन्हा त्यांना २०१९ मध्ये जनतेने विधानभवनात पाठवले. आमदार साहेबांनी गेल्या दहा वर्षांचा सत्तेचा वापर फक्त आणि फक्त विकास कामांसाठीच केला. त्यामुळे गेवराई मतदारसंघातील जनमत कायम आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या पाठीशी उभे आहे आणि हेच जनमत आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांना तिसऱ्यांदा गेवराई मतदारसंघाचे उर्वरित जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी पाठवणार आहेत यात शंका नाही. असे मत प्रा. गांडगे संदिप यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

 

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …