06/09/25

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या विजयासाठी वकिल बांधव सरसावले ! बीड जिल्हा वकिल संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी साधला संवाद

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या विजयासाठी वकिल बांधव सरसावले !

बीड जिल्हा वकिल संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी साधला संवाद

बीड, दि. १६ (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार कुंडलिक बापू खांडे यांच्या विजयासाठी वकील बांधव सरसवले आहेत. त्यामुळे कुंडलिक बापु खांडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
तिसऱ्या आघाडीच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कुंडलिक हरीभाऊ खांडे यांनी काल शनिवार रोजी बीड जिल्हा वकिल संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांशी बीड शहरातील हॉटेल निलकमल येथे संवाद साधला. यावेळी बोलताना कुंडलिक बापु खांडे म्हणाले की,
मागील पाच वर्षांत तत्कालीन लोकप्रतिनिधीने वकिल संघाच्या निदान समस्या ऐकून घेण्याचा तरी प्रयत्न केला का? असा सवाल करत विकासाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि बीड मतदारसंघासाठी सातत्यपूर्ण विकास होण्यासाठी मला यावेळी आपला मतदानरूपी आशीर्वाद द्या, विजयी करा असे आवाहन कुंडलिक खांडे यांनी केले. त्यानंतर वकील संघाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी कुंडलिक बापू खांडे यांना निवडून आणण्याचा निर्धार करत वकील संघाची मोठी ताकद आपल्या पाठीशी उभी करू असा विश्वास दिला. त्यामुळे कुंडलिक बापू खांडे यांच्या विजयात वकील संघाचा मोठा वाटा राहणार आहे.
या वेळी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. रोहीदास येवले, उपाध्यक्ष अॅड. अविनाश गडगे, उपाध्यक्ष अॅड. नितीन वाघमारे, सचिव अॅड. सय्यद यासेर पटेल, सहसचिव अॅड. श्रीकांत जधव, कोषाध्यक्ष गिराम, ग्रंथपाल सचिव अॅड. भीमा जगताप, महिला प्रतिनिधी, छाया वाघमारे, अॅड. पिसुरे, अॅड. सुहास महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
_______________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …