पेठ बीडच्या नागरिकांचा निर्धार यंदा वंचितचाच आमदार..!
बलभीम नगर, पेठ बीड, नाळवंडी नाका येथे कॉर्नर बैठकीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद
बीड दि.१७ (प्रतिनिधी)-बीड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पुरुषोत्तम नारायणराव यांच्या प्रचारार्थ १३ नोव्हेंबर रोजी रात्री८ वाजता. पेठ बीड, बलभीम नगर, नाळवंडी नाका, सुभाष नगर,नागोबा गल्ली येथील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पुरुषोत्तम नारायणराव वीर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, बीड शहराध्यक्ष लखन (काका) जोगदंड,जिल्हा संघटक डॉ.गणेश खेमाडे,वंचित बहुजन आघाडीचे नेते अन्वर पाशा, पुष्पाताई तुरुकमारे,कल्पनाताई गोरे, अर्जुन जौंजाळ, उपस्थित होते.
या बैठकीस संबोधित करताना जिल्हाध्यक्ष अजय सरवदे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पुरुषोत्तम वीर हे आपल्या परिवारातील सदस्य असून त्यांनी आयुष्यभर चळवळीशी असलेली नाळ तुटू दिली नाही, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सदैव अग्रेषित असणार व्यक्तिमत्व म्हणून वीर हे सर्वपरिचित आहेत. यावेळी एड.प्रकाश आंबेडकर यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी लढणार नेतृत्वास उमेदवारी देऊन खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. तेव्हा आपण वीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना या स्वाभिमानी परिवर्तनाच्या लढाईत सहकार्य करायचे आहे. पुढे बोलताना सरवदे म्हणाले की, पेठ बीड बलभीम नगर नाळवंडी नाका सुभाष नगर भागातील प्रत्येक घरातील तरुणांनी वीर यांचा प्रचार हाती घेऊन त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करावा.