06/09/25
Oplus_131072

गितांजली लव्हाळे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण

गितांजली लव्हाळे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण

वडवणी दि.०३ (बापू धनवे)- प्रति वर्षी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मैत्री फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात येते. या वर्षीचे पुरस्कार नुकतेचे जाहीर झाले. या वर्षीच्या पुरस्कारासाठी वडवणी येथील इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका श्रीमती गितांजली लव्हाळे मॅडम यांना जाहीर झाला. सदरील पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रति वर्षी समाजातील साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण यासह  विविध सेवा  क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींचा मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊ सन्मानित केले जाते. यंदाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताचे जाहीर झाले आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्याबद्दल यावर्षीच्या
शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वडवणी आणि वडवणी परिसरातील ग्रामीण भागात शैक्षणिक वर्ष सन २०१० पासून इंग्रजी स्कूलच्या माध्यमातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या वडवणी येथील इंग्लिश स्कूलच्या उपक्रमशील शिक्षका श्रीमती गितांजली रंगराव लव्हाळे मॅडम या
वडवणी तालुक्यामध्ये खमक्या महिला पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी वडवणी पोलीस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता कमिटीच्या सदस्या म्हणून काम करताना अनेकांना मदत केली. त्याच बरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे भरीव कार्य केले. तसेच गरजू महिलांना मोफत साड्या वाटप, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटपाचे काम सातत्याने करतात या सर्व
कार्याची दखल घेत पत्रकार तथा शिक्षिका गीतांजली लव्हाळे मॅडम यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती निवड समितीचे प्रमुख तथा मैत्री फाउंडेशनचे संस्थापक श्री. द. ल. वारे, जिल्हाध्यक्ष संजय राठोड, जिल्हा उपाध्यक्ष योगेश सोळसे यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता बीड  शहरातील सामाजिक न्याय भवन येथे मान्यवरांच्या हस्ते वितरीत होणार आहे.
शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पत्रकार तथा शिक्षिका गीतांजली लव्हाळे मॅडम यांचे संगीता आदमाने, उषा लोंढे, उद्धव बडे, सरिता नाईकवाडे, उज्वला वनवे, हर्ष ढाकणे यांच्यासह शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी अभिनंदन केले. सध्या गितांजली मॅडम यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
____________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …