06/09/25

ताशी 140 प्रति कि मी ने झाली हायस्पीड रेल्वे चाचणी बीडमध्ये रेल्वे कृती समितीने केले रेल्वे इंजिनचे पूजन

ताशी 140 प्रति कि मी ने झाली हायस्पीड रेल्वे चाचणी

बीडमध्ये रेल्वे कृती समितीने केले रेल्वे इंजिनचे पूजन

बीड दि.५ (प्रतिनिधी)-अहमदनगर बीड परळी या रेल्वेमार्गाला आता चांगलीच गती मिळाली असून आज अहमदनगर ते बीड हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली प्रति तास 140 किमी ने ही चाचणी यशस्वी झाली आणि बीडकरांनी आनंदोत्सव साजरा केला. बीड रेल्वेस्थानकावर स्वतंत्र सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीच्या वतीने रेल्वे इंजिनचे पूजन करण्यात आले. त्यांनतर रेल्वे अधिकार्‍याचा सत्कार देखील करण्यात आला.

जिल्हावासियांच्या दृष्टीने आजचा दिवस सोनेरी पहाट घेवून उगवला. गेल्या अनेक दशकांपासूनचे स्वप्न आज रेल्वे पाहिल्यानंतर पुर्णत्वास जात असल्याचे चित्र बीडच्या रेल्वे स्टेशनवर पहायला मिळाले. विघनवाडी येथील रेल्वे स्टेशनवरून निघालेली रेल्वे 140 च्या स्पीडने आज दुपारी 1.45 वाजता बीडच्या रेल्वे स्टेशनवर येवून थांबली. उपस्थित बीडकरांनी रेल्वेचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले. बीडच्या स्टेशनवर येताच सीआरएस टीममधील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी प्लॉट फॉम क्रमांक 1 च्या बाजुला वृक्षारोपन केले. दरम्यान बीडकरांच्या स्वप्नपुर्तीचा आनंद गंगनात मावेनासा झाला असून खा.बजरंग सोनवणे, आ.संदीप क्षीरसागर यांनीही नवगणराजुरी येथील रेल्वे स्थानकाला भेट देवून रेल्वे अधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर हि रेल्वे बीडच्या स्थानकावर आली बीड शहरातील पालवण रोडवरील रेल्वे स्टेशनवर आलेली रेल्वे पहाण्यासाठी बीडकरांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पुर्ण होत असल्याने बीड शहराती रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिकांनी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून रेल्वेचे स्वागत केले.यावेळी रेल्वे मागणी आंदोलन समितीच्या वतीने रेल्वे इंजिनचे पूजन केले त्यानंतर समितीच्या वतीने रेल्वे अधिकार्‍याचा सत्कार केला त्यात रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांचे स्वागत समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा अशोक शेटे यांनी सोइओ अविनाश पांडे यांचा सत्कार जेष्ठ सदस्य सत्यनारायण लाहोटी आणि चंपावतीपत्र चे संपादक सुनील क्षीरसागर यांनी,सीई यादव यांचा सत्कार सुरेश मेखे व लाईक अहमद यांनी ,अभियंता लोळगे यांचा सत्कार शांतीलाल पटेल मंगेश लोळगे आणि डॉ अरुण भश्मे यांनी ,तर राजीवजी वर्मा यांचा सत्कार संपादक रामचंद्र जोशी सुरेश बुद्धदेव आणि आपासाहेब शिंदे यांनी केला यानंतर समितीच्या सदस्यांनी अधिकार्‍याशी रेल्वेच्या प्रश्नावर चर्चा केली .
————————–

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …